मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । धाराशिव जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण पॉझिटिव्ह आढळला असून त्याच्यावर उमरग्याच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय कक्षात उपचार सुरु केले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . राजाभाऊ गलांडे यांनी दिली.
धाराशिव जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला असून उमरगा तालुक्यातील हा रुग्ण पॉझिटिव्ह आहे . मात्र , त्याची पत्नीचा अहवाल निगेटीव्ह आहे . सदरील रुग्ण हा दिल्ली व पानिपत येथे फिरायला गेला होता आणि तो दोन दिवसांपूर्वी उमरगा येथे आला होता.त्यांनतर त्याचे स्वब नमुने घेतले होते त्यातील त्या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे . त्याच्यावर उमरगा उपजिल्हा रुग्णालयाच्या कक्षात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक राजाभाऊ गलांडे यांनी दिली. पानिपत मार्गे धाराशिव त्याने जिल्ह्यात प्रवेश केल्याची बाब उघड झाली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज