मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोनाने संपूर्ण अमेरिकेत भीषण थान सुरू केले आहे . बुधवारी एकाच दिवशी कोरोनाने एक हजार लोकांचा बळी घेतल्याने या देशातील कोरोना बळींची संख्या पाच हजारांवर गेली आहे , तर या एकाच दिवशी अमेरिकेत २६ हजार नव्या रुग्णांची भरही पडली आहे.
अमेरिकेत बुधवारी २६ , ४७३ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे आढळले . तर , १ , ०४९ जणांचा मृत्यू झाला . त्यामुळे अमेरिकेतील एकूण बळींची संख्या ५ , १०२ इतकी झाली आहे . ‘ वल्डॉोटर ‘ या संस्थेने ही माहिती आज गुरुवारी दिली आहे . अमेरिकेत कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव न्यू यॉर्कमध्ये झाला आहे . येथे बुधवारी कोरोनाबाधितांची संख्या ८३ , ९०१ च्या घरात गेली आणि २ , २१९ जणांचा मृत्यू झाला . बुधवारी एकाच दिवशी ५०५ मृतांची नोंद करण्यात आली . न्यू यॉर्कनंतर न्यू जर्सीमध्ये करोनाचा कहर सुरू आहे . या प्रांतात कोरोनाचे २२ , २५५ रुग्ण आढळले असून , ३५५ जणांचा मृत्यू झाला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज