मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । देशातील कोरोना व्हायरस परिस्थितीचे गंभीर स्वरूप पाहावयास मिळत असून याचा विपरित परिणाम आर्थिक घडामोडीवर होत आहे . मुंबई शहरामध्ये स्थानिक स्पर्धा मोठ्या प्रमाणात भरविल्या जातात पण सध्या कोव्हिड – १९ प्रसारामुळे देशातील सर्व क्रीडास्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत . त्यामुळे क्रिकेट स्कोरर , सामनाधिकारी यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. आता मुंबईतील क्रिकेट पंचांच्या एका समुहाने आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई क्रिकेट संघटनेच्या व्यवस्थापक समितीचे माजी सदस्य तसेच बीसीसीआयचे माजी पंच गणेश अय्यर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील क्रिकेट पंचांनी स्थानिक क्रिकेट स्कोरर आणि सामनाधिकारी यांना अर्थिक मदत देण्याची ग्वाही दिली आहे. मुंबईला कोरोना व्हायरसचा जबरदस्त फटका बसला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज