mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कर्नाटकात भाजप कोमात, काँग्रेस जोमात; काँग्रेसची जोरदार मुसंडी; बहुमताचा आकडा आता फक्त काही जागांवर दूर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 13, 2023
in राष्ट्रीय
कर्नाटकात भाजप कोमात, काँग्रेस जोमात; काँग्रेसची जोरदार मुसंडी; बहुमताचा आकडा आता फक्त काही जागांवर दूर

मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।

संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. निकालाचा पहिला कल हाती आला आहे. काँग्रेसने कर्नाटकमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे.

काँग्रेससाठी बहुमताचा आकडा आता फक्त काही जागांवर दूर आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी तयारी सुरू आहे. काँग्रेस सरकार स्थापन झालं आणि तेही पूर्ण बहुमत झाल्यावर सिद्धरामय्या मुख्यमंत्री होणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे सर्व आमदारांना दाखले घेऊन बंगळुरूला येण्याच्या सूचना देण्यात आल्या.

विशेष म्हणजे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सातत्याने अहवाल घेत आहेत. निकालानंतर आमदारांना घेऊन बेंगळुरूला येण्यास सांगण्यात आले.

हेलिकॉप्टर आणि उड्डाणाची तयारी सुरू आहे. बेळगाव धारवाड हुबळी गुलबर्गा बिलारी येथे हेलिकॉप्टर आणि उड्डाणाची व्यवस्था केली आहे.

निकालानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत भाजपला कोणत्याही प्रकारे संधी मिळू नये, यासाठी काँग्रेसकडून खबरदारी घेतली जात आहे. प्रत्येक मिनिटाचा अहवाल घेतला जात आहे.

प्रत्येक जागेचा मागोवा घेतला जात आहे. सर्व आमदारांना कनेक्टिंग पॉईंट्सवर पोहोचल्यानंतर बंगळुरूला येण्यास सांगितले आहे. संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे.

कर्नाटक विधानसभेच्या 224 मतदारसंघांसाठी 10 मे रोजी झालेल्या निवडणुकीची मतदान पूर्ण झालं.

या वेळी राज्यात विक्रमी 73.19 टक्के मतदान झालं.224 जागांसाठी निकाल हा आज जाहीर होणार आहे. सकाळी 8 वाजता राज्यभरात 36 केंद्रांवर मतमोजणी सुरू होईल.

मतमोजणीसाठी सर्व केंद्रांवर पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. 224 जागांसाठी निकाल हा आज जाहीर होणार आहे.

एक्झिट पोलमध्ये जनतेचा कौल काँग्रेसच्या बाजूने असला, तरी लिंगायत, वोक्कालिगा, मुस्लिमांचे मते कोणाच्या पारड्यात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहेत. दुपारपर्यंत हा निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे

तर बेळगावातील 18 मतदारसंघातील निकाल हे दुपारी दोन वाजेपर्यंत जाहीर होऊ शकतात.

कर्नाटक राज्याचे वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत इथल्या जनतेने सलग दोन वेळा कोणत्याही राजकीय पक्षाकडे सत्ता सोपवली नाही. दर पाच वर्षांनी राज्यात सत्ताबदल झाल्याचं पाहायला मिळालंय.

ADVERTISEMENT

यंदा मात्र हा समज मोडून काढण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यामुळे आता जनता कुणाच्या पाठिशी राहते आणि कुणाला बाजूला सारते हे आज स्पष्ट होईल.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कर्नाटककाँग्रेस
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

पावसाचा विजय! चेन्नई सुपर किंग्स-गुजरात टायटन्स फायनल स्थगित; ‘या’ दिवशी होणार लढत

शिष्याला गुरुच भारी! चेन्नईने पाचव्यांदा जिंकले IPL विजेतेपद; फायनलमध्ये गुजरात पराभूत

May 30, 2023
पावसाचा विजय! चेन्नई सुपर किंग्स-गुजरात टायटन्स फायनल स्थगित; ‘या’ दिवशी होणार लढत

CSK vs GT : चेन्नई आणि गुजरातचे ‘हे’ खेळाडू तुम्हाला करतील मालामाल; वाचा बेस्ट ड्रीम इलेव्हन

May 29, 2023
आयुष्य समर्पीत! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशवासीयांना आवाहन; स्वातंत्र्यदिनी ‘हा’ संकल्प केला

नवीन संसद भवन ही केवळ इमारत नाही तर 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब; पंतप्रधान मोदी; 12 धर्माच्या प्रतिनिधींनी केली प्रार्थना; पाहा Video

May 28, 2023
पुन्हा नोटाबंदी! 2 हजारांची नोट चलनातून बाहेर; आरबीआयचा मोठा निर्णय

पुन्हा नोटाबंदी! 2 हजारांची नोट चलनातून बाहेर; आरबीआयचा मोठा निर्णय

May 20, 2023
Breaking! ठाकरे सरकारला मोठा धक्‍का, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय; मुख्यमंत्री जनतेशी साधणार संवाद

मोठी बातमी! महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्याच लागणार; सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे संकेत

May 10, 2023
संतापजनक! मंगळवेढयात एका शिक्षकाने विदयार्थ्यावर केले अनैसर्गिक कृत्य, मुलाला ठार मारण्याची दिली धमकी; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

महिलेच्या मोहापायी देशद्रोह! डीआरडीओचा संचालक हनीट्रॅपमध्ये अडकला; पुण्यात एटीएसकडून अटक

May 6, 2023
‘मन की बात’ खास बनवण्यासाठी जय्यत तयारी; विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन

‘मन की बात’ खास बनवण्यासाठी जय्यत तयारी; विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन

April 29, 2023
मोदींची चिंता दूर! कोण म्हणतं मोदी लाट ओसरली? यूपीपासून मणिपूरपर्यंत मोदी मोदी मोदी; 2024 ला फिर एक बार?

मिशन २०२४! कर्नाटकातील निवडणुकीच्या तोंडावर समान नागरी कायद्यावर बैठकांना वेग

April 19, 2023
खळबळ! लवंगी ग्रामपंचायत कामामध्ये मोठा भ्रष्टाचार, सरपंचास अपात्र करण्याची मागणी;…अन्यथा आंदोलनाचा दिला इशारा

पंचायत पुरस्कारासाठी सोलापूर जिल्ह्यातील चार गावांची राज्य पातळीवरून राष्ट्रीय पातळीवर शिफारस

April 9, 2023
Next Post
माचणूरच्या सूरज डोके यांनी केली सौर उर्जेवरील चार उत्पादनांची निर्मिती; 15 जणांना मिळाला रोजगार

माचणूरच्या सूरज डोके यांनी केली सौर उर्जेवरील चार उत्पादनांची निर्मिती; 15 जणांना मिळाला रोजगार

ताज्या बातम्या

मोठी बातमी! दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर; कुठे आणि कसा पाहाल? जाणून घ्या

मुलींची बाजी! मंगळवेढा तालुक्यात दहावी निकालात इंग्लिश स्कूलची ‘ही’ विद्यार्थ्यांनी राज्यात पहिली; शंभर टक्के निकालाच्या ‘या’ आहेत शाळा

June 2, 2023
भीतीदायक! मंगळवेढ्यात जीप आडवून दाेघांना लुटले, ६२ हजारांचा मुद्देमाल जबरीने नेला काढून; ‘या’ मार्गावरील घटना

ब्रेकिंग! मंगळवेढ्यात अवैध देशी, विदेशी दारूची वाहतूक करणारे पिकअप पकडले; 10 लाखांचा मुद्देमाल जप्त; API अंकुश वाघमोडे यांची धडाकेबाज कामगिरी

June 2, 2023
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

खिडक्या थरथरल्या. भांडी खणखणली… मंगळवेढा परिसरात गूढ मोठा आवाज; ‘या’ गोष्टीचा असल्याचा अंदाज

June 2, 2023
उन्हाच्या झळा आणखी वाढणार; हवामान खात्यानं दिलेला ‘हा’ इशारा पाहून वेळीच सावध व्हा..!

सावधान! आज, उद्या जणू उष्णतेची लाटच; उगाचंच घराबाहेर नका पडू, ‘ही’ काळजी घ्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आवाहन

June 2, 2023
मंगळवेढा । DYSP पदाची सुत्रे विक्रांत गायकवाड यांनी स्विकारली; कारखाना रोडने होणारी अवैध वाळू वाहतूक रोखण्याचे असणार आवाहन

मंगळवेढा । DYSP पदाची सुत्रे विक्रांत गायकवाड यांनी स्विकारली; कारखाना रोडने होणारी अवैध वाळू वाहतूक रोखण्याचे असणार आवाहन

June 2, 2023
Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

कोल्हापूर येथे उपोषणास बसलेले ते सर्व गुन्हेगारच; पोलिस निरिक्षक रणजित माने यांचे गंभीर आरोप

June 2, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा