टीम मंगळवेढा टाईम्स ।
अन्न व पोषण सुरक्षा अभियान पौष्टिक तृणधान्य अंतर्गत बाजरी १० वर्षांच्या आतील बियाण्याकरिता ३० रुपये किलो दराने बियाणे अनुदानावर
तसेच बाजरी सलग पीक प्रात्यक्षिकासाठी ४० आर (१ एकर) क्षेत्रासाठी १०० टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ४ जून पर्यंत अर्ज करता येणार आहे.
अन्न व पोषण सुरक्षा अभियान भराड धान्य अंतर्गत मका पीक प्रात्यक्षिकासाठी ४० (१ एकर) क्षेत्रासाठी १०० टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ४ जूनपर्यंत अर्ज करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक तथा कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने यांनी केली आहे.
या सुविधेंतर्गत लाभार्थ्यांनी सन २०२४ मधील खरीप हंगामात अन्न व पोषण सुरक्षा अभियान कडधान्यांतर्गत तूर, मूग व उडीद १० वर्षांच्या आतील बियाण्याकरिता ५० रुपये किलो दराने बियाणे अनुदानावर उपलब्ध होणार आहे.
तूर, मूग व उडीद १० वर्षाच्या आतील बियाण्याकरिता २५ रुपये किलो दराने बियाणे अनुदानावर उपलब्ध होणार आहे. तसेच तूर, मूग व उडीद सलग प्रात्यक्षिके आंतरपीक पद्धती व पीक पद्धतीवर आधारित
पीक प्रात्यक्षिकासाठी ४० आर (१ एकर) क्षेत्रासाठी १०० टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज