टीम मंगळवेढा टाईम्स ।
पाच वर्षांमध्ये वाड्या-वस्त्या वर पाण्याची व्यवस्था करणे ,दिवाबत्ती पुरवणे, गावा मधील अंतर्गत रस्ते अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करणे, गरजेच्या ठिकाणी हाय मोस्ट उभे करणे, बनतांडा गावापासून प्राथमिक शाळेत पर्यंतचा रस्ता तयार करणे, प्राथमिक शाळेला पाण्याची पूर्तता करणे,ग्रामपंचायतीचा आज पर्यंत सर्व कारभार सुरळीत चालला आहे का याची फेरतपासणी करून चुकीच्या गोष्टी झाली असेल तर दोषीवर कारवाई करणे, आणि योग्य त्या व्यक्तीला न्याय देण्याची भूमिका पुढील काळात करणार आहे.
गावातील शैक्षणिक दर्जा वाढविणे व्यसनाधीनता कमी करणे प्रत्येक युवकाला व्यवसाय करून दोन रुपये कसे मिळवता येतील या गोष्टीकडे मुख्य भर असणार आहे, सर्व घरकुलाची यादी तपासणी करणे,आज पर्यंत आलेल्या निधि चा योग्य वापर झाला आहे का ,झाला नसेल तर का झाला नाही.
आणि पुढील काळात कशाप्रकारे करता येईल याचा परिपूर्ण अभ्यास करून कामाची सुरुवात करणे, ग्रामपंचायत मध्ये तक्रार पेटी ठेवून ,योग्य त्या तक्रारीची दखल घेऊन विकास करण्याचा पुढील काळात प्रयत्न असणार असल्याचे प्रतिपादन भारत नाना भालके करिअर ॲकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत नंदकुमार पवार यांनी केले आहे.
ग्रामपंचायत लमाण तांडा (बालाजी नगर )झालेल्या निवडणुकीमध्ये काही लोकांना बाजूला करून दिलेल्या मतदारांचा कौल नक्कीच कौतुकास्पद आहे.
या निवडणुकीमध्ये अफवांना बळी न पडता चांगल्या विचाराने प्रेरित झालेल्या काम करण्याची प्रवृत्ती अंगी साकारलेल्या कैलासवासी लालजी राजपूत यांच्या आशीर्वादाची सात असणाऱ्या व आमदार भारत नाना भालके साहेब यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या सर्व उमेदवारांना चांगल्या मताधिक्याने निवडून देऊन एक प्रकारे लोकशाहीचा विजय असं म्हणावं लागेल.
अशा प्रकारचे मत निवडणुकीचा केंद्रबिंदू असलेला कणखर धाडसी नेतृत्व श्रीकांत पवार यांनी मांडले.
निवडणूक प्रक्रियामध्ये संस्थापक अध्यक्ष तुळसाबाई रजपूत ,उत्तम जी राजपूत सर, अमरजी रजपूत सर, राहुल जी राजपूत यांनी सर्वांना वेळोवेळी मार्गदर्शन केले ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून प्रामाणिक केलेल्या प्रयत्न सुद्धा ही अल्पसंतुष्ट लोकांनी थारा लागू दिला नाही म्हणून विलास राठोड, हरिश्चंद्र राठोड, शंकर जी पवार ,फुलसिंग पवार ,महादेव राठोड ,गणपती पवार ,पुरुषोत्तम राठोड,सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मच्छिंद्र पवार या सर्व मान्यवर मंडळींनी एकत्र येऊन समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून खंबीरपणे उभे राहून एक मताने एक दिलाने मोलाची भूमिका बजावली.
कोणताही अनुचित अनुचित प्रकार घडू नये आणि आपल्या पॅनलचा मोठ्या मताने विजय व्हावा म्हणून सचिन राठोड, संजय राठोड, निवास चव्हाण ,विकास पवार ,आनंद राठोड ,रोहिदास पवार, खंडू पवार, महादेव पवार, सतीश पवार, बाळू पवार (सोलापूर), आधी कार्यकर्त्यांचा मुलाचा वाटा होता.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज