mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप? एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; भाजपची धाकधूक वाढली

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 30, 2024
in राजकारण, राज्य
लाडकी बहीणनंतर लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा खात्यात येणार ‘इतकी’ रक्कम; पंढरपूरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

महाराष्ट्रात नव्या सरकारच्या स्थापनेबद्दला सस्पेन्स दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. एकीकडे महायुतीचे नेते दिल्लीत अमित शाहांची भेट घेतात, मुंबईत महायुतीची बैठक आयोजित करण्यात येते. आणि दुसरीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री साताऱ्यातील त्यांच्या गावाता, दरेगावात गेल्याची बातमी समोर येते.

यामुळे शुक्रवारची महायुतीची मोठी आणि प्रस्तावित बैठक स्थगित करण्यात आली. यानंतर नव्या चर्चांना उधाण आलं. त्यातच शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी एकनाथ शिंदे यांच्या आगामी निर्णयाबद्दल संकेत देणारं एक वक्तव्य केलं.

मुख्यमंत्री शिंदे यांना जेव्हा एखाद्या मोठ्या निर्णयावर विचारविनिमय करायचा असतो तेव्हा ते आपल्या गावी जातात, आज संध्याकाळपर्यंत ते मोठा निर्णय घेतील असं शिरसाट म्हणाले.

मात्र याच विलंबामुळे विधानसभा निवडणुकींचा निकाल जाहीर होऊन एक आठवडा उलटला तरी राज्यात अद्याप नवं सरकार स्थापन झालेलं नाही. शिवसेनेच्या सूत्रांच्या सांगण्यानुसार, शुक्रवारी स्थगित झालेली बैठक उद्या रविवारी मुंबईत आयोजित करण्यात येऊ शकते. तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या सांगण्यानुसार, विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी ते केंद्रीय निरीक्षकांच्या येण्याची वाट पाहत आहेत.

एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन नव्या सरकारस्थापनेबाबत चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाल्याचे सांगत शुक्रवारी मुंबईतील बैठकीदरम्यान ही बोलणी पुढे जातील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती.

मात्र भाजपच्या सूत्रांच्या सांगण्यानुसार, शुक्रवारी महायुतीची कोणतीही बैठक होणार नव्हती. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या नेत्यांनी अमित शाह आणि जेपी नड्डा यांची दिल्लीत भेट घेऊन सत्तावाटपावर चर्चा केली होती

शिंदे उपमुख्यमंत्री बनण्यास तयार नाहीत ?

नव्या सरकारमधील शिंदे यांच्या भूमिकेवरून शिवसेनेत मतभेद निर्माण होत आहेत. काही नेते शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा सल्ला देत आहेत. पण अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिल्यावर आता ही भूमिका त्यांच्यासाठी उपयुक्त ठरणार नाही, असे काहींचे मत आहे. शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले नाही तर हे पद त्यांच्या पक्षातील अन्य कोणत्या तरी नेत्याकडे जाईल, असे शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी सांगितले.

शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचं मत काय ?

नवीन सरकारमध्ये शिंदे यांची प्रमुख भूमिका असावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शंभूराज देसाई म्हणाले. तर शिंदे रागावलेले नसून, प्रकृतीच्या कारणामुळे गावी गेल्याचे सामंत यांचे म्हणणे आहे. आता रविवारी बैठक झाली नाही तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा शक्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पुढील आठवड्यात होऊ शकतो शपथविधी सोहळा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने 132, शिवसेनेने 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) 41 जागा जिंकल्या. नव्या सरकारचा शपथविधी पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. मात्र, सत्तावाटप आणि शिंदे यांच्या भूमिकेवरून सुरू असलेली धुसफूस यामुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडत आहे. महायुतीच्या रविवारी होणाऱ्या प्रस्तावित बैठकीत या दिशेने मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संबंधित बातम्या

मंगळवेढेकरांनो! दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालय व इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन; ‘ही’ प्रसिद्ध सिनेअभिनेत्रीची असणार उपस्थिती

दहावीच्या निकालात मोठा उलटफेर! पुनर्मूल्यांकनानंतर मंगळवेढ्याची पाटील महाराष्ट्रात सर्वप्रथम; मंगळवेढा इंग्लिश स्कूलच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

June 20, 2026
बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

मोठी बातमी! सरकारी जमिनी हडपणाऱ्यांना मोठा दणका… ‘या’ जमिनींवर आता थेट महाराष्ट्र शासनाचे नाव लागणार…;  ‘इतक्या’ महिन्यांचा अल्टीमेटम

June 20, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! राज्याला पावसाची हुलकावणी, हवमान विभागाचा हादरवणारा अंदाज; आता थेट ‘या’ तारखेनंतरच पाऊस

June 20, 2026
‘चांगले दिवस येणार होते, पण तू सोडून गेलीस…’ रीलस्टार रोहिणी पारध्ये आत्महत्येप्रकरण; पतीची पहिली पोस्ट चर्चेत, नेमके कारण काय?

स्क्रीनवर लाखो फॉलोअर्स, पण खऱ्या आयुष्यात नरकयातना! रिल स्टार रोहिणी पाराध्येच्या मृत्यूचा खरा विलन अखेर समोर; मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 20, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

राज्य सरकारची मोठी घोषणा! महिला बचत गटांना मिळणार अडीच एकर जमीन आणि 1 लाखांचं अनुदान; काय आहे योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये?

June 18, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

महायुती सरकारचं मोठं पाऊल, ‘या’ शहरामध्ये सुरू होतेय देवाभाऊ टॅक्सी सेवा; स्वस्तात मस्त होईल प्रवास

June 18, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

धक्कादायक! नव्या दुचाकीची खरेदी, मिठाईतून 7 जणांना विषबाधा; थेट तुकाराम मुंढेंशी संपर्क अन् स्वीट मार्ट सील

June 17, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मंगळवेढ्यात खळबळ! तुकाराम मुंढेंच्या धसक्याने स्वीट मार्टमधील मलाई, पेढा अन् पनीर गायब; मग आतापर्यंत नागरिक जे खात होते ते काय होतं?

June 15, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

सरपंच निवड जनतेतून तर ग्रामपंचायत सदस्यांचे काय महत्त्व? ‘हम करे सो कायदा’ म्हणत मनमानी कारभार; प्रहार संघटनेचे राकेश पाटील यांचा थेट सरकारला सवाल

June 15, 2026
Next Post
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

विरोधी उमेदवारास मताधिक्य, 'या' गावाची स्वखर्चाने बॅलेटवर चाचणी मतदानाची तयारी; तहसील कार्यालयाला दिले पत्र

ताज्या बातम्या

मंगळवेढेकरांनो! दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालय व इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन; ‘ही’ प्रसिद्ध सिनेअभिनेत्रीची असणार उपस्थिती

दहावीच्या निकालात मोठा उलटफेर! पुनर्मूल्यांकनानंतर मंगळवेढ्याची पाटील महाराष्ट्रात सर्वप्रथम; मंगळवेढा इंग्लिश स्कूलच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

June 20, 2026
धक्कादायक! ज्या रुग्णालयात हजारो रुग्णांवर उपचार केले तिथंच घेतला अखेरचा श्वास; सोलापूरमधील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ.शिरीष वळसंगकर यांनी जीवन संपवलं

सोलापुरात खळबळ! देवमाणूस गेला, पण मागे वादाची ठिणगी पडली; डॉ. वळसंगकर यांच्या कुटुंबातील ‘तो’ वाद अखेर चव्हाट्यावर; पोलिसांसमोर मोठा खुलासा

June 20, 2026
बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

मोठी बातमी! सरकारी जमिनी हडपणाऱ्यांना मोठा दणका… ‘या’ जमिनींवर आता थेट महाराष्ट्र शासनाचे नाव लागणार…;  ‘इतक्या’ महिन्यांचा अल्टीमेटम

June 20, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! राज्याला पावसाची हुलकावणी, हवमान विभागाचा हादरवणारा अंदाज; आता थेट ‘या’ तारखेनंतरच पाऊस

June 20, 2026
मोठी बातमी! धैर्यशील मोहिते पाटलांनी दिला भाजपा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा; भाजपाची मोठी डोकेदुखी वाढणार

अदृश्य शक्तीनं आम्हाला साथ दिली, दुष्काळात ‘वसंत’ बहरेल; धैर्यशील मोहिते पाटलांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

June 19, 2026
‘चांगले दिवस येणार होते, पण तू सोडून गेलीस…’ रीलस्टार रोहिणी पारध्ये आत्महत्येप्रकरण; पतीची पहिली पोस्ट चर्चेत, नेमके कारण काय?

स्क्रीनवर लाखो फॉलोअर्स, पण खऱ्या आयुष्यात नरकयातना! रिल स्टार रोहिणी पाराध्येच्या मृत्यूचा खरा विलन अखेर समोर; मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 20, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा