टीम मंगळवेढा टाईम्स।
विठ्ठल सहकारी साखर कारखान्यात दोन दिवसापूर्वी झालेल्या दुर्घटनेतील दोन मयत कामगारांच्या कुटुंबियांना अनुक्रमे सहा व पाच लाख रुपयांची आर्थिक मदत कारखान्याकडून करण्यात आली आहे.
कामगारांनी रात्रपाळीनंतर प्रवास टाळावा. त्यांना कारखाना कार्यस्थळाच्या ठिकाणी असणारी निवासस्थाने मागणीनुसार उपलब्ध करून देण्यात येतील.
सुरक्षेसंदर्भात आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन चेअरमन अभिजीत पाटील यांनी केले.
कारखाना कार्यस्थळावर मंगळवारी सायंकाळी शोकसभा घेण्यात आली. यावेळी पाटील बोलत होते. कामगारांनी कारखाना कार्यस्थळाच्या ठिकाणी असणाऱ्या निवासस्थानांची मागणी करावी, त्या ठिकाणी पाणी, विजेची व्यवस्था केली जाईल.
रात्रपाळी संपल्यानंतर प्रवास टाळून कामगारांनी कारखाना परिसरात मुक्कामी थांबावे. कामगारांना सर्व त्या प्रकारची मदत केली जाईल.
मयत झालेल्या सुधाकर सदाशिव चौगुले ( रा. सांगवी ता. पंढरपूर) यांच्या दोन मुलांच्या नावे प्रत्येक ३ लाख रूपयांची एफडी करण्यात आली आहे.
तर सोमनाथ मारुती नरसाळे (रा. जळोली ता. पंढरपूर) या कामगाराच्या आईच्या नावे ५ लाख रूपयांची एफडी कारखान्याकडून करण्यात आली आहे.
दोन्ही कामगारांना वर्क मॅन कॉम्पिशसन प्रमाणे विमा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच त्याबाबतची कार्यवाही होईल.
यावेळी कामगार प्रतिनिधी तसेच संचालक दिनकर चव्हाण, प्रा. तुकाराम मस्के, प्र. कार्यकारी संचालक डी. आर. गायकवाड यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले.।
यावेळी व्हाईस चेअरमन प्रेमलाता रोंगे, संचालक साहेबराव नागणे, नवनाथ नाईकनवरे, नरसाळे, कालिदास पाटील, जनक भोसले, यांच्यासह इतर सर्व संचालक, कामगार उपस्थित होते.
अपघातातील कर्मचारी अत्यवस्थ
विठ्ठल कारखान्यातील केनगार्ड सुपरवायझर शरद अर्जुन घाडगे (देगाव, ता. पंढरपूर) यांचा सोमवारी पंढरपूर तहसील कार्यालयासमोर अपघात झाला. त्यामध्ये ते गंभीर जखमी होऊन अंत्यवस्थ झाले आहेत.
त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती मदत कारखान्याकडून करण्यात येत आहे. कारखाना त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभा आहे असेही अभिजीत पाटील यांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज