मंगळवेढा : समाधान फुगारे
मंगळवेढा येथील इंग्लिश स्कूल शाळेतील एसएससी 1984 व एच एस सी १९८६ सलाचे विद्यार्थी तब्बल 36 वर्षांनी एकमेकांना भेटले सर्वांच्या चेहऱ्यावर अवर्णीय आनंद होता.
डॉ.शरद शिर्के श्री सुरेश वच्छ ,किरण धोंगडे, विठ्ठल फुगारे यांचे कल्पनेतून सन एसएससी 1984 व एच एस सी १९८६ च्या स्नेह मेळावा इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथे पार पडला.
सुरुवातीला अल्प प्रतिसाद असणारा हा मेळावा एक रंगतदार, अविस्मरणीय स्नेह मेळावा ठरला. सर्व वर्गमित्र तब्बल 36 वर्षांनी एकमेकांना भेटत होते.
त्यामुळे त्यांचे चेहऱ्यावर अवर्णीय आनंद होता. स्नेह मिळाव्याचे अध्यक्षस्थानी सौ.मीनाताई कदम होत्या प्रमुख पाहुणे म्हणून श्री काळुंगे सर उपस्थित होते.
प्रस्ताविकात पंढरपूरचे भुलतज्ञ डॉ.राजेंद्र जाधव म्हणाले की, माझे संपूर्ण आयुष्य शिक्षकांच्या गुरुजनांच्या सहकार्य व मार्गदर्शन यामुळे घडले आहे.
काळंगे सर भोसले सर यांचे सर्व शिक्षकांमुळे मी डॉक्टर होऊन समाजाची सेवा करू शकलो. डॉ.शरद शिर्के यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले मी इंग्लिश स्कूल व शिकवणारे गुरुजन वर्ग यांच्यामुळे घडलो.
मी व माझे वडील तसेच माझा मुलगा, आमचे सर्वांचे शिक्षण इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथे झाले आहे. माझ्या यशामध्ये शाळेचे खूप मोठे योगदान आहे.
मनोगतात बजाज जनसंपर्क अधिकारी किरण धोंगडे म्हणाले की, स्व.बी टी पाटील सर व सर्व गुरुजनामुळे आमचे वर्गातील पन्नासहून अधिक जण उद्योगपती, डॉक्टर ,अधिकारी सैनिक शिक्षक होऊन देशाची सेवा करत आहेत.
आज हे पाहायला बी टी पाटील सर आपल्यामध्ये दुर्दैवाने आपल्यामध्ये नाहीत ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया नवी दिल्ली यांना भेटून बजाज रक्तपेढीचा ब्लड कंपनी प्रोजेक्ट मंजूर करून आणू शकलो याला कारणीभूत आपल्या गुरुजनांचे मार्गदर्शन असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.काळंगे सर आपल्या भाषणात म्हणाले की, डॉ.शरद शिर्के यांनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल काढून मंगळवेढ्यासारख्या ग्रामीण भागातील पेशंटचे अनमोल जीव वाचवण्याचे समाजकार्य केले.
वर्गातील सर्वजण चांगले स्थिरस्थावर झाल्याने आयुष्याच्या उत्तरार्धात सर्वांनी समाजसेवा करून समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करावा.
जमदाडे सर यांनी उत्स्फूर्त विनोदी भाषण करून स्नेह मेळावा ही आमची प्रेरणा असून त्यातून जगण्याची उमेद वाढते.
श्रीधर भोसले सर यांनी बी टी पाटील सर यांचे कडून व्यवस्थापन शिकल्यामुळे पुढील आयुष्यात अडचण आली नाही.
असा गौरव पूर्ण उल्लेख केला दिवटे सर यांनी विविध किस्से सांगून वर्गातील आठवणी ताज्या केल्या अडचणीच्या काळात मदत केलेल्या अशी कदम गुरुजी व काळुंगे सर यांना कधीही विसरू शकणार नाही असे सांगितले.
गजेंद्र गडकर सर, पोळ सर सखाराम हजारे ए एस पाटील ,पी एम गायकवाड, टाले मॅडम, जगताप मॅडम यांच्या भाषणामुळे कार्यक्रम रंगतदार व अविस्मरणीय झाला.
कार्यक्रमाचे आयोजना बद्दल डॉ.शरद शिर्के, किरण धोंगडे, विठ्ठल फुगारे व जयदीप रत्नपारखी यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी सुरेश वच्छे, अमेरिकेहून आले होते. बापूसाहेब वाकडे पोलीस सब इन्स्पेक्टर ,शंकर माळी ,विवेक पंडित वैभव पाटील ,अशोक बिराजदार संतोष गायकवाड, जमिल काझी,
भीमाशंकर पाटील, महादेव पाटील, तुकाराम भीमदे ,डॉ. पांडुरंग कदम, दावल इनामदार, समीर शेख आवर्जून उपस्थित होते शेवटी जयदीप रत्नपारखी यांनी आभार मानले.
स्नेह मेळाव्यामुळे ऋणानुबंधाचे पुनर्जीवन झाल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर झळकत होता.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज