mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूरचे पाणी पळवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर आता बुलेट ट्रेनचा मार्ग बदलण्याचा घाट

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 22, 2021
in सोलापूर
अखेर ठरले! महाविकास आघाडीची ‘या’ 12 आमदारांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सोलापूरच्या हक्काचे पाणी पळवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर आता पुन्हा सोलापूरकरांवर अन्याय होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मुंबई-हैदराबाद ही सोलापुरातून जाणारी प्रस्तावित बुलेट ट्रेन आता नांदेडमार्गे नेण्याचा घाट घातला जात आहे.

राज्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना तसे मागणी पत्र दिले आहे. यामुळे सोलापुरातून जाणारी महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेनच पळवण्याचा डाव काँग्रेसकडून रचला जात असल्यामुळे सोलापूरकरांमधून संताप व्यक्त होत आहे.

सोलापूर रेल्वेस्थानक हे दक्षिण भारताला जोडणारे रेल्वेस्थानक म्हणून ओळखले जाते. रेल्वेच्या जाळ्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी तसेच व्यापार्‍यांना येथील माल हा देशाच्या कानाकोपर्‍यात पोहोचवण्यास मदत होत आहे.

सोलापूर रेल्वेस्थानक तसेच सोलापूर जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून ऑक्टोबर 2020 मध्ये मुंबई ते हैदराबाद बुलेट ट्रेनच्या मार्गामध्ये सोलापूर स्थानकाचाही समावेश करण्यात आला आहे.

मुंबई ते हैदराबाद या मार्गातील एकूण 11 मार्गांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील अकलूज, पंढरपूर आणि सोलापूर या तीन रेल्वेस्थानकांचा प्रस्तावित स्थानकामध्ये समावेश होणार आहे.

महाराष्ट्रातील नियोजित बुलेट ट्रेन प्रकल्पाची अंमलबजावणी राष्ट्रीय स्तरावर होण्यासाठी नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनची स्थापना झाली. बांधकाम सुरू करण्याच्या मुलभूत निविदा उपक्रम सुरू आहे.

या मार्गाचा प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) यांच्याकडून सर्व्हे करण्यात येत आहे. लेझर उपकरणे ही विमान तसेच हेलिकॉप्टरमध्ये बसवून सर्वेक्षण केले जात आहे. सोलापूरपर्यंत या मार्गाचे सर्वेक्षणदेखील झालेले आहे.

बुलेट ट्रेन प्रकल्प सोलापूर जिल्ह्यातून गेल्यास याचा फायदा सोलापूरकरांना होणार आहे. केंद्रीय प्रकल्प असल्यामुळे बुलेट ट्रेन मार्गावरील शेतकर्‍यांना याचा मोबदला चांगला मिळणार असून, या परिसरातील शेतीलाही चांगला भाव येणार आहे.

यामुळे आर्थिक प्रगती होण्यासदेखील चालना मिळणार आहे. शिवाय प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीची सोय अधिक प्रमाणामध्ये होणार आहे.

महत्त्वाकांक्षी असा बुलेट ट्रेनचा सोलापुरातील मार्ग जात असताना हा मार्ग बदलून नांदेडमार्गे नेण्यासाठी राज्य मंत्रिमंडळातील बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मागील आठवड्यामध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली.

महाराष्ट्रातील बुलेट ट्रेनच्या नियोजनामध्ये मुंबई-पुणे-सोलापूरमार्गे हैदराबाद जाणार्‍या मार्गामध्ये बदल करून मुंबई- औरंगाबाद- जालना- नांदेड- हैदराबाद या मार्गाचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्याची मागणी केली आहे.

काँग्रेस पक्षाचे असलेले माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान मंत्री अशोक चव्हाण यांनी सोलापुरातून जाणार्‍या बुलेट ट्रेनचा मार्ग बदलून त्यांच्या स्वतःचा जिल्हा असलेल्या नांदेड जिल्ह्यातून बुलेट ट्रेन नेण्याची मागणी केल्यामुळे सोलापूरकरांमध्ये आता नाराजी पसरू लागली आहे.

सोलापूर जिल्ह्याचे खमके नेतृत्व राज्यस्तरावर नसल्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये तसेच सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी सोलापुरास दुय्यम स्थान देण्यात येत असल्याची भावना सोलापुरातील जनतेमध्ये आता आणखी वाढू लागली आहे.

मागील महिन्यामध्ये पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनीतून पाणी इंदापूरला नेण्याचा घाट घातला होता. याला लोकप्रतिनिधी, शेतकरी संघटनांनी प्रखर विरोध केला होता. सोलापूरकरांच्या लढ्यामुळे सरकारला निर्णय बदलावा लागला.

आता परत सोलापुरातून जाणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प बदलण्याचा घाट घातला जात असून पुन्हा सोलापूरकरांनी विकासासाठी एकजूट दाखवण्याची गरज व्यक्त होत आहे.

राष्ट्रवादी पक्षाचे असलेले सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनीच्या विषयावर सोलापूरविरोधी भूमिका घेतल्याची भावना सोलापूरकरांमध्ये निर्माण झाली. पालकमंत्र्यांच्या निर्णयामुळे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसविरोधी नाराजी वाढली होती. ही नाराजी कमी करण्यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नेटाने प्रयत्न करून निर्णय बदलल्यामुळे वातावरण निवळले होते.

आता पुन्हा काँग्रेसच्या बड्या नेत्याने सोलापुरातून जाणार्‍या बुलेट ट्रेन मार्ग बदलण्याची मागणी केल्यामुळे काँग्रेस पक्ष हा जनतेच्या रडारवर आला आहे. सोलापुरातील काँग्रेसचे नेते याबाबत कोणती भूमिका घेणार, याकडे सोलापूरवासियांचे लक्ष राहणार आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: बुलेट ट्रेनसोलापूर

संबंधित बातम्या

दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026

ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्याकडे ५०० रुपयांची खंडणी; साहाय्यकाची हकालपट्टी करत पोलिसांत गुन्हा दाखल; ​दुष्काळी अनुदानाची भीती दाखवून पैशांची मागणी

October 4, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

चाकूने भोसकून थरार घडवणाऱ्या वडदेगाव येथील दत्ता बागल यांचा हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींची तुरुंगातच रवानगी; सोलापूर न्यायालयाचा दणका; वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य

October 4, 2026
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

दुष्काळात दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा; ​मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

September 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

अस्मानी-सुलतानी संकटांपुढे १८ वर्षांचा पोराचा धीर सुटला; संकटांच्या मालिकेने सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याचा घेतला बळी; रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी

September 30, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

गुगलवरून नंबर शोधणं पडलं महागात! पाच रुपये ऑनलाइन पाठवायला सांगून पाच लाख खात्यातून लुटले; हॉस्पिटल अपॉइंटमेंटच्या नावाखाली सायबर दरोडा

October 1, 2026
Next Post
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

उजनी पाणलोट क्षेत्रात संततधार, दौंडमधून उजनीत 'एवढा' क्युसेक विसर्ग; पाणीसाठ्याचा प्रवास वजामधून अधिककडे

ताज्या बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणीटंचाई आणि चाऱ्याचे संकट! सर्व ८ मंडलांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत; मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; आ.आवताडे यांची मोठी ग्वाही

October 7, 2026
सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा