मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा- सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर सायकलींग करीत व्यायाम करणार्या एका 42 वर्षीय तरूणास सकाळी 6.00 वा.जोराची धडक दिल्याने ते जागीच मयत झाले होते.
दरम्यान अपघातानंतर फरार झालेल्यात्या ट्रक चालकाचा सी.सी.टि.व्ही.कॅमेराच्या माध्यमातून शोध घेण्यात पोलिसांना यश आले असून येत्या दोन दिवसात पोलिस ठाण्यात तो फरार चालक हजर होणार असल्याचे पोलिस सुत्रांकडून सांगण्यात आले.
या घटनेची हकिकत अशी,दि.31 जुलै रोजी सकाळी 6.00 वा. यातील मयत चंद्रकांत शिवानंद सोनगे (वय 42,रा.सिध्दापूर) हे मंगळवेढयातून सोलापूर रोडने सायकलींग व्यायाम करून मंगळवेढयाकडे परतत असताना
शिवप्रसाद हॉटेलच्या समोरील बाजूस सोलापूरकडून आलेल्या ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिल्याने ते जागीच मयत झाले होते.
दरम्यान,घटनेनंतर ट्रकचालक पोलिसात खबर न देता वाहन घेवून फरार झाला होता.मयत सोनगे हे मुळचे सिध्दापूर येथील असून ते मंगळवेढा येथे रहावयास होते.
या घटनेनंतर अपघाताची फिर्याद मयताचे भाऊ संतोष सोनगे यांनी दाखल केल्यावर अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल झाला होता.या अपघाताचा तपास पोलिस नाईक ईश्वर दुधाळ यांच्याकडे होता.
अपघातानंतर ट्रक पाहणारे कोणीही नेत्र साक्षीदार नसल्याने या अपघाताचा शोध घेणे तसे खूपच जिकिरीचे होते. मात्र प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकारी नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक दुधाळ यांनी इजगांव टोळ नाका येथील सी.सी.टी.व्ही. फुटेज
तसेच मंगळवेढा ब्रीजजवळील असलेल्या महामार्गावरील फुटेज प्राप्त करून कसून शोध घेण्याचा प्रयत्न केला असता हा ट्रक नांदेड येथील असल्याचे स्पष्ट झाले.
तदनंतर पोलिसांनी चालकाशी संपर्क साधला असता तो ट्रक माल घेवून छत्तीसगढला गेल्याचे सांगण्यात येवून दोन दिवसात ट्रकसह मंगळवेढा पोलिस ठाण्यात हजर राहण्याच्या सक्त सूचना पोलिसांनी चालकास दिल्या आहेत.
या अपघाताचा व्हिडीओ व्हॅटसअॅपवर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी ट्रकचालकाच्या अतिवेगाने व निष्काळजीपणे वाहन चालविल्याबाबत संताप व्यक्त केला.
सायकलींग करणारा मयत हा एका बाजूने सायकल चालवित असल्याचे त्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत असून भरधाव वेगाने ट्रक येवून अचानक रोडच्या बाजूला वळून धडक देवून पुढे सुसाट वेगाने निघून गेल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज