मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा शहरातील सांगोला नाका परिसरात दारूचे सेवन करून वाकडी तिकडी मोटर सायकल चालविल्याप्रकरणी दत्तात्रय तुकाराम गावडे(वय 42,रा.जोतीबानगर) याच्याविरूध्द मोटर वाहन अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेची हकिकत अशी,यातील फिर्यादी पोलिस शिपाई प्रविण जाधव,पोलिस उपनिरिक्षक सुभाष शेटे आदी सांगोला नाका परिसरात पेट्रोलिंग करीत असताना
विजयसिंह मोहिते पाटील प्रशालेच्या समोर दि.3 रोजी 6.45 वा. एम एच 13 ए आर 8981 वरील चालक तथा आरोपी दत्तात्रय गावडे हा त्याच्या ताब्यातील मोटर सायकल वाकडी तिकडी चालवत येत असल्याचा पोलिसांना दिसून आला.
पोलिसांनी हाताचा इशारा करून त्यास थांबवून त्याचे नाव,गाव विचारले असता ड्रिंक केल्याने तो काही बोलू शकत नव्हता.पुन्हा त्यास नाव विचारल्यानंतर त्याने आपले नाव दत्तात्रय गावडे असे सांगितले.
खाजगी काम करून तो जोतीबा नगर येथील राहते घराकडे चालला असल्याचे तो म्हणाला.त्याच्याकडे मोटर सायकल चालविण्याच्या परवान्याबाबत चौकशी केली असता त्याच्याकडे परवाना मिळून आला नाही.
तसेच त्याच्या तोंडाचा उग्र वास येत असल्याने दारूच्या अंमलाखाली असल्याचा संशय आल्याने त्याची ब्रेथ अॅनालायझर मशिनने तपासणी केल्यावर टेस्ट पॉझिटिव्ह आली असून अमलाचे प्रमाण 59.7 एमजी/100 एमल पॉझिटिव्ह दिसून आली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज