मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
खतं आणि बियाणांचं लिंकिंग करणाऱ्या आणि जास्त भावात विकणाऱ्या कंपन्यांवर राज्य सरकार कारवाई करणार असल्याची माहिती राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली आहे.
अकोला येथे आज जिल्हा खरीप नियोजनची बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी आकाश फुंडकर बोलत होते. काल अकोला जिल्ह्याची खरीपपुर्व आढावा बैठक प्रचंड वादळी ठरली.
अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात ही बैठक पार पडलीय. या बैठकीत शेतकऱ्यांना वेळेवर आणि गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठांचा पुरवठा करण्याच्या मागणीवर लोकप्रतिनिधींनी भर दिला आहे.
यावेळी बियाणे आणि खतांच्या पुरवठ्यावरुन जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची चांगलीच सरबत्ती केली आहे. मात्र, यात अपुऱ्या माहितीमुळं अनेकदा कृषी विभागाचं पितळ उघडं पडलं आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामात एकूण 10 लाख हेक्टर क्षेत्रावर पीक लागवडीचे नियोजन कृषी विभागाने ठरवलं आहे. जिल्ह्यातील आमदारांनी यावेळी पालकमंत्र्यांकडे लिंकिंग आणि आणि जास्त भावात बियाणांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या बैठकीला जिल्ह्यातील आमदारांसह जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी लिंकिंग करणाऱ्या कंपन्यांवर सरकार कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान, खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकावरून त्यांनी जोरदार टीका केलीये. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे आम्ही बाल साहित्य वाचत नसतो असं ते म्हणाले. यासोबत संजय राऊत हा वाह्यात माणूस असल्याचा टोलाही मंत्री आकाश फुंडकर यांनी राऊतांना लगावला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज