mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

नागरिकांनो! कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या 38 जणांवर गुन्हे, 13 लाख रुपयांचा दंड

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 14, 2021
in सोलापूर
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

टीम मंगळवेढा टाईम्स ।

पंढरपूर तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पोलीस प्रशासनामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, 3 हजार 214 नागरिकांकडून 13 लाख 48 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच उल्लंघन करणाऱ्या 38 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे हा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तातडीने उपाययोजना करण्याबरोबरच विविध निर्बंधही घातले आहेत.

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंढरपूर पोलीस प्रशासनाच्यावतीने शहर व ग्रामीण भागात जनजागृती करुन मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतराचे पालन करणे आदीबाबत वेळोवेळी आवाहन करण्यात येत आहे.

तरीही काही नागरिक नियमांचे उल्लंघन करीत आहे. अशा नागरिकांवर पोलीस प्रशासनामार्फत कारवाई करण्यात येत आहे. या अनुषंगाने दिनांक 1 जानेवारी ते 12 मार्च 2021 या कालावधीत मास्क न वापरणाऱ्या 3 हजार 59 नागरिकांवर कारवाई करुन 13 लाख 32 हजार 700 रुपये व गर्दीच्या ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्या 155 नागरिकांकडून 15 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतिबंध कायद्यातंर्गत कलम 188 अन्वये 38 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहितीही श्री.कदम यांनी दिली

नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे तसेच मास्कचा वापर करावा , गर्दीच्या ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन करावे, प्रशासनाने कोरोना संदर्भात दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करावे,

जे नागरिक कोरोनाबाबत नियमांचे उल्लघन करतील त्यांच्यावर दंडात्मक तसेच साथरोग प्रतिबंध कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत कारवाई करण्यात येईल अशा इशाराही उपविभागीय पोलीस अधिकारी कदम यांनी यावेळी दिला आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कोरोना नियमगुन्हे दाखलपंढरपूर

संबंधित बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू , शिक्षक नवऱ्याविरोधात गुन्हा; नेमकं काय घडलं?

April 27, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

मोठी बातमी! जो तक्रार करायला आला, तोच लुटारू निघाला; पोलिसांच्या जाळ्यात ‘तो’ तोतया चालक; मंगळवेढा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

April 26, 2026
धक्कादायक! मंगळवेढ्यात पतीचा पत्नीवर चाकू हल्ला; कारण वाचून थक्क व्हाल…पती विरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! वृद्ध आईला न सांभाळता लाथाबुक्क्यांनी मारहाण करून घराबाहेर दिले हाकलून; ‘या’ कायद्याअंतर्गत मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

April 21, 2026
माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीसांचा सत्कार; मालकांनी ठरल्याप्रमाणे केलं… आता संधी मिळणार का? परिचारक समर्थकांचा सवाल

​आता नाही तर कधीच नाही! परिचारकांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा की भाजप पुन्हा धक्का देणार? विधान परिषदेच्या निवडणुकीने राजकारण तापलं; पालकमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं..

April 20, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

सावधान! मंगळवेढ्यात ‘हनी ट्रॅप’ स्टाईलने लूट करणारी टोळी गजाआड; LCB ची धडाकेबाज कारवाई, महिला आरोपी अटकेत

April 20, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

संतापजनक! किरकिर करते म्हणून नातीने ८२ वर्षांच्या आजीला दगडावर आपटून मारले; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 17, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

​भगीरथ, मला बोलायला लावू नका; तुम्ही मला का भेटला होता, ते जाहीर करू का?– पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खळबळजनक इशारा

April 15, 2026
धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त

खळबळजनक! पंढरपुरातील ॲसिड हल्ला प्रकरणाला नवं वळण; तरुणीचा धक्कादायक खुलासा

April 15, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

भगीरथदादा आता प्रवास पुरे! ‘पक्षांतराचा प्रवास आता थांबवा’; सिद्धाराम म्हेत्रेंचा भगीरथ भालकेंना रोखठोक सल्ला

April 13, 2026
Next Post
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

धोका वाढतोय! सोलापूर ग्रामीण भागात आज 118 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, मंगळवेढ्यातील एकाचा कोरोनाने घेतला बळी

ताज्या बातम्या

मोठी बातमी! कृषिभूषण अंकुश पडवळे यांना पिस्तुल दाखवून केली जबर मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; काय आहे नेमके प्रकरण; जाणून घ्या..

धक्कादायक! 16 वर्षांच्या मुलगा मोबाईलमध्ये गुंग झाला अन् तोल जाऊन चौथ्या मजल्यावरुन पडला, पण…

April 27, 2026
लोकनेता! घोडके कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; चेअरमन अनिल सावंतांनी सावरले, दिला माणुसकीचा आधार

लोकनेता! घोडके कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; चेअरमन अनिल सावंतांनी सावरले, दिला माणुसकीचा आधार

April 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

शाळेच्या उंबरठ्यावरच दारूचे पेले? मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा संताप; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

April 27, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू , शिक्षक नवऱ्याविरोधात गुन्हा; नेमकं काय घडलं?

April 27, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

सावधान! ‘लुटेरी दुल्हन’ सक्रिय; मंगळवेढ्यात नवरीने लावला २.७० लाखांचा चुना, पळून जाणाऱ्या ‘नवरी’सह महिला एजंट जेरबंद

April 26, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

मोठी बातमी! जो तक्रार करायला आला, तोच लुटारू निघाला; पोलिसांच्या जाळ्यात ‘तो’ तोतया चालक; मंगळवेढा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

April 26, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा