टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील रड्डे येथील ज्ञानदेव कोंडीबा नवत्रे याला भावजयीचा विनयभंग केल्याप्रकरणात झालेली शिक्षा पंढरपूर येथील जिल्हा सत्र न्यायाधीश एन.के.मोरे यांनी अपिलात रद्द केली आहे.
या खटल्याची हकिकत अशी की, रड्डे ता. मंगळवेढा येथील ज्ञानदेव कोंडीबा नवत्रे याने दि.15/6/2009 रोजी सायंकाळी 4.30 वा. त्यांच्या शेतात कोणी नसताना भावजयीचा विनयभंग केल्याची फिर्याद मंगळवेढा पोलिसात दाखल होती.
पोलिसांनी चौकशी करून मंगळवेढा न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्यानंतर त्याची सुनावणी होवून समोर आलेल्या साक्षी पुराव्यावरून मंगळवेढा न्यायालयाने आरोपीस तीन महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनावली होती.
यावेळी भाऊ रामचंद्र नवत्रे, मुलगी व त्याची पत्नी यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या.
सदर निकालाविरूध्द आरोपीच्यावतीने अॅड.धनंजय हजारे यांनी पंढरपूर येथील जिल्हा सत्र न्यायालात युक्तीवाद मांडला.
यामध्ये ही केस जमीनीच्या वादातून दाखल झाली आहे. तसेच साक्षीदारांच्या साक्षीमध्ये केस शाबीत होईल असा कोणताही पुरावा नाही, जमिनीच्या वादावरून
खोटी केस दाखल केल्याचे मुद्दे न्यायालयासमोर मांडल्यानंतर न्यायालयाने सदर युक्तीवाद ग्राह्य मानून आरोपीची अपिलात निर्दोष मुक्तता केली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज