टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा-सोलापूर रोडवर सोनाई दुध घेवून जाणार्या दुधाच्या टँकरने दोन मोटर सायकलस्वारांना धडक दिल्याची घटना रविवारी दुपारी 3.00 वा. घडली असून या अपघातात दिनकर कोकरे हे मोटर सायकलस्वार गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची हकिकत अशी, सोनाई दुध घेवून एम एच 42 ए क्यू 2005 हा टँकर इंदापूरकडे जात असताना रविवारी दुपारी 3.00वा. ब्रम्हपुरी गावाजवळून सर्व्हिस रोडवरून जाताना
दोन मोटर सायकलस्वारांना या टँकरने पाठीमागून ठोकरल्याने मोटर सायकलस्वार दिनकर कोकरे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्या पाठीला मार लागला आहे.
तर दुसर्या जखमीचे नाव कळू शकले नाही.या दोन मोटर सायकल गाडयांचे अपघातामध्ये मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
अपघाताच आवाज येताच ब्रम्हपुरी ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेवून तात्काळ महामार्गावरील अॅब्युलन्स गाडी बोलावून जखमींना मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
टँकरमध्ये दुध असून हे नाशवंत असल्याने ग्रामस्थांनी त्याचे नुकसान होवू नये म्हणून संबंधित चालक सिध्देश्वर सुरवसे (रा.कुर्डूवाडी)याला सहकार्य केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज