टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील 16 गावाच्या गावगाड्याचा मालक कोण? हे आज निकालानंतर समजणार असले तरी मतदारांचा कौल आपल्याच बाजूने मिळावा यासाठी उमेदवार व समर्थकांनी आपापल्या ग्रामदैवताकडे साकडे घातले आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलिस निरीक्षक रणजित माने यांन कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.
निकालानंतर कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी करू नये म्हणून गावापातळीवर मिरवणूक काढण्यासाठी प्रशासनाने बंदी घातली आहे.
तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी मतमोजणीचे उत्कृष्ट नियोजन केले असून मतमोजणी ११ टेबलवर २ फेऱ्यात होणार आहे.
मतमोजणीसाठी ११ निवडणूक निर्णय अधिकारी, १६ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व १६ शिपाई अशा ४३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती निवडणूक विभागाचे उमाकांत मोरे यांनी सांगितले. (स्रोत:सकाळ)
पहिल्या फेरीत मतमोजणी
मारापुर, गुंजेगाव, ढवळस सोड्डी, शिरनांदगी, डोंगरगाव, पाठखळ, येड्राव, गोणेवाडी, खोमनाळ, तळसंगी, पौट ची मतमोजणी पहिल्या फेरीत
दुसऱ्या फेरीत मतमोजणी
तर मारोळी, बावची, भालेवाडी, ढवळस, हाजापूर गावाची मतमोजणी दुसऱ्या फेरीत होणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज