mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आबांची मोठी व्यूहरचना! शेतकऱ्यांचा राजवाडा परत सुरू करण्यासाठी आज भालकेंच्या बालेकिल्ल्यात सभा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 29, 2022
in सोलापूर
भगिरथ भालके चेअरमन असलेल्या विठ्ठल कारखान्यात कोट्यवधींचा घोटाळा; अभिजीत पाटील यांचा गंभीर आरोप

पंढरपूर : प्रतिनिधी

पंढरपूर तालुक्यातील श्री.विठ्ठल सह साखर कारखान्याच्या निवडणुकीत चांगलीच रंगत येणार आहे. यासाठी विठ्ठल परिवारातून मोठी मोर्चेबांधणी सुरू आहे.

यामधीलच एक नेते अभिजित पाटील यांनी गावभेटी दौऱ्याबरोबरच गटनिहाय विचारविनिमय बैठकीच्या माध्यमातून सभा गाजविण्यास सुरुवात केली आहे.

यामध्ये आज रविवार दि २९ मे रोजी सायंकाळी ६ वाजता सरकोली येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

या निवडणुकीसाठी नेमके किती पॅनल निवडणूक रिंगणात असतील याबाबत अद्याप अंदाज येत नसला तरी, धाराशिव शुगरचे अभिजित पाटील यांनी मात्र या निवडणुकीत उतरण्यासाठी म कागील अनेक महिन्यापासून तयारी चालू ठेवली आहे.

तालुक्यातील गटनिहाय बैठकीला सभासद वर्ग उपस्थित राहत असल्याचे चित्रही पहावयास मिळत आहे.

तुंगत आणि पट कुरोली येथील विचार विनिमय बैठकीला हजारोंच्या संख्येने उपस्थिती झाली होती. अशाच बैठका उर्वरित गटामधूनही घेण्यासाठी तयारी सुरू आहे.

शेतकऱ्यांचा राजवाडा परत सुरू करण्यासाठी परिवर्तन करूया, शेतकऱ्यांचे हित हीच खरी विठ्ठल सेवा हे ब्रीद वाक्य टाकून अभिजित पाटील दौरे आटोपत आणले आहेत.

विठ्ठल परिवारातील अनेक सभासद यांनी तर आतापासूनच विस्वास ठेवीत अभिजित पाटील यांच्या बैठकांना मोठी उपस्थिती दाखविली जात आहे.

केवळ सभासद नव्हे तर विठ्ठलचे अनेक माजी संचालक यांनी पाठराखण करणेस सुरुवात केली आहे.

या होणाऱ्या विचार विनिमय बैठकीला सभासद, ऊस तोडणी वाहतूकदार कामगार यांना निमत्रित करण्यात येत आहे.

सरकोली हा गट विद्यमान चेअरमन भालके यांचा बालेकिल्ला मानला जातो, याच गटातील ही विचारविनिमय बैठक खुद्द सरकोली गावात होणार आहे.

यामुळे या बालेकिल्ला येथील सभेसाठी किती प्रतिसाद मिळणार हे सभेच्या वेळी उपस्थित सभासद संख्येवरच दिसून येणार आहे.

सध्यागटनिहाय निवडणुकीत पात्र ठरलेल्या सभासद यांची यादी प्रसिद्ध झालेली आहे. निवडणूक काही दिवसात जाहीर होऊ शकते ही बाब लक्षात घेऊन अभिजित पाटील यांच्या गटाकडून फारच मोठी व्यूहरचना आखली जात आहे.

आजवरचा अनुभव पाहता त्यांनी काळे गटातील अनेक मोहरे आपल्या गटात सामावून घेतले आहेत. यामुळे आगामी विठ्ठलची निवडणूक कोण कोणासोबत एकत्रित राहून लढविणार याचा बन्यापैकी अंदाज लागू लागला आहे .

सध्या तरी कारखान्यातील जुनी देणी दिल्याशिवाय विद्यम न संचालक मंडळ निवडणूक लढविण्यासाठी कोणत्याही हालचाली करू शकत नाही.

यामुळे कारखान्याचे संस्थापक चेअरमन कर्मवीर औदुंबर आण्णा पाटील यांचे नातू युवराज पाटील यांनी आपल्या सोबत कारखान्याचे संस्थापक व्हा चेअरमन स्व .यशवंतभाऊ पाटील यांचे नातू अॅड . गणेश पाटील , आणि अॅड . दीपक पवार यांच्यासह विठ्ठलच्या माजीसंचालकांना सोबत घेऊन ही निवडणूक लढविण्यासाठी तयारी आखली आहे.

त्यांनीही गावभेटी आणि वैयक्तिक भेटी सुरू ठेवल्या आहेतच. मागील निवडणुकीत सर्वच प्रस्थापित नेतेमंडळी एकाच बाजूला असतानाही यांना चांगलीच टक्कर देत आपले नाव सर्व सभासदांच्या घरापर्यंत पोहचविले होते.

ते शिक्षण सम्राट डॉ.बी.पी रोंगे सर यांनीही या निवडणुकीत उतरण्यासाठी तयारी सुरूच ठेवली आहे. अवघ्या काही दिवसातच विठ्ठलची निवडणूक जाहीर होणार आहे.

यामुळे सत्ताधारी संचालक मंडळाच्या विरोधात जे निवडणुकीत आहेत. त्यांनी मात्र निवडणूक लढविण्यासाठी जोरदार तयारी ठेवली आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अभिजित पाटील

संबंधित बातम्या

वाळू आता ऑनलाईन मिळणार; ‘ना नफा, ना तोटा’ वर विक्री, नव्या धोरणाला मान्यता; यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती नेमली जाणार

नियम धाब्यावर बसवून वाळू उपसा भोवला! भीमा नदीतील वाळू ठेका रद्द; १ कोटी २० लाखांची ठेव जप्त, गुन्हे दाखल करण्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा झटका

August 5, 2026

कुत्रा पाळताय? मग खबरदार! श्वानाने बालिकेला चावल्यानंतर सोलापुरात मालकावर गुन्हा; ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शक्यता

August 4, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

आषाढी एकादशीला ३३ लाखांची तुफान गर्दी, तरीही एकही चोरी नाही; सोलापूर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी; SP अतुल कुलकर्णी यांचे ‘स्मार्ट’ नियोजन

August 2, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

प्रशासनाचा मोठा निर्णय! सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे विभाजन; जाणून घ्या तुमच्या भागातील नवीन उपविभाग; नागरिक व भाविकांना कसा होणार फायदा?

July 28, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आत्याच्या मुलाशी लग्न, पदरात 2 मुली, सुखाचा संसार सुरू असतानाच महिलेनं मुलीसह संपवलं जीवन, सोलापूर जिल्ह्यात हळहळ

July 29, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

सोलापूरकरांसाठी सर्वात मोठी खूशखबर! उजनी ७५ टक्के भरले; दोन-तीन दिवसांत धरण ‘इतक्या’ टक्क्यांचा टप्पा पार करणार; शेतकऱ्यांची वर्षभराची चिंता मिटणार

July 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

जमीन खरेदीचा व्यवहार पडला महागात! कमिशन बुडाल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

July 26, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

शेतकरी कर्जमुक्ती योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ तारखेपर्यंत पैसे जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; योजनेतील प्रमाणपत्रप्राप्त शेतकरी

July 25, 2026
Next Post
दुर्दैवी! मंगळवेढा तालुक्यात पावसाचा हाहाकार, वीज पडून 13 वर्षीय मुलीचा मृत्यू

राज्यात आजपासून ४ दिवस जोरदार पाऊस; 'या' भागात हजेरी, हवामान विभागाचा इशारा

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

मंगळवेढ्यात कर्जमाफीचा मोठा धमाका! ‘त्या’ एकाच गावातील ३५६ शेतकऱ्यांना जॅकपॉट

August 5, 2026
वाळू आता ऑनलाईन मिळणार; ‘ना नफा, ना तोटा’ वर विक्री, नव्या धोरणाला मान्यता; यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती नेमली जाणार

नियम धाब्यावर बसवून वाळू उपसा भोवला! भीमा नदीतील वाळू ठेका रद्द; १ कोटी २० लाखांची ठेव जप्त, गुन्हे दाखल करण्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा झटका

August 5, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा

August 4, 2026
दारुडा भाऊसाहेब! गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह ‘या’ दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

August 4, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मुलीचा संसार वाचवण्यासाठी सासू सरसावली; जावयाला किडनी दान करून दिले नवजीवन

August 4, 2026

कुत्रा पाळताय? मग खबरदार! श्वानाने बालिकेला चावल्यानंतर सोलापुरात मालकावर गुन्हा; ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शक्यता

August 4, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा