टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील शिवनगीतील २२ वर्षीय विवाहितेने डाळिंब बागेतील तणनाशक मारण्याचे औषध पिवून आत्महत्या केल्याची घटना घडली असून, या घटनेची मंगळवेढा पोलिसात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. याची खबर शिवशंकर बंडगर यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, – शिवशंकर बंडगर हे मुख्यमंत्री युवा – प्रशिक्षणार्थी म्हणून मंगळवेढा पोलिस ठाण्यात काम करीत आहे. सदर खबर देणाऱ्याचा भाऊ हणमंत याचे लग्न २०१६ मध्ये झाले असून, मयत मधुमती हणमंत बंडगर हे त्यांच्या दोन मुलासह खबर देणाऱ्याच्या शेजारी जुन्या घरी राहावयास आहेत.
त्यांच्यात घरगुती कारणावरून नेहमी वाद होत असे, त्यांची सामायिक शेती असून, त्याचे औषधे कायम घरी असत. दि. २२ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता खबर देणारे मंगळवेढा येथे असताना लहान भावाचा फोन आला.
वहिनी तथा मयत मधुमती हिने औषध पिले आहे. तिला म्हेत्रे हॉस्पिटल उमदी (जि. सांगली) येथे घेऊन गेले आहोत, असे सांगितले. खबर देणारे उमदी हॉस्पिटलमध्ये आल्यावर मयत मधुमती ही शुध्दीवर आलेली दिसली. त्यावेळी तिच्यावर उपचार चालू होते.
आई शिवम्मा हिच्याकडे मधुमतीने औषध पिण्याबाबत विचारपूस केली असता तिने नवरा बायकोच्या झालेल्या घरगुती वादामुळे डाळिंब बागेतील तण मारण्याचे औषध पिल्याचे सांगितले. तेथील डॉक्टरांनी पुढील उपचाराकरिता संजिवनी हॉस्पिटल मंगळवेढा येथे घेऊन जाण्यास सांगितले.
मधुमती हीस खासगी वाहनाने आणून तेथे दाखल केले. येथील डॉक्टरांनी मधुमतीस तपासले असता ती पहाटे साडेचार वाजता मयत झाल्याचे सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज