मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
कुटुंबातील मुलांची माहिती लपवत बनावट छोटे कुटुंब प्रतिज्ञापत्र सादर केले. त्या आधारावर या शिक्षक पदाची सरकारी नोकरी करत पगार घेणे शिक्षक असलेल्या दाम्पत्याला चांगलेच महागात पडले आहे.
अपत्यांची माहिती लपवण्याची माहिती समोर आल्यानंतर याप्रकरणी चौकशी करण्यात आली. यानंतर गटविकास अधिकारी यांच्या आदेशानुसार शिक्षक दाम्पत्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर पंचायत समिती अंतर्गत विश्वी येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक गजानन सातपुते आणि पांगरखेड येथील शाळेवर कार्यरत असलेल्या त्यांच्या पत्नी छाया सातपुते या दोघांना मेहकर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी निलंबित केले आहे.
या दोन्ही पती – पत्नी शिक्षक दांपत्याने आपल्या कुटुंबातील मुलांची माहिती लपवत बनावट छोटे कुटुंब प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्या आधारावर या दांम्पत्याने शिक्षक पदाची सरकारी नोकरी करत पगार घेतला.
शिक्षक पती- पत्नीस चार अपत्य
२००५ च्या शासन अधिसूचनेप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांचे कुटुंब लहान असणे गरजेचे आहे. मात्र शिक्षणाधिकारी यांच्या चौकशीअंती शिक्षक गजानन नामदेव सातपुते यांना ४ अपत्य असून त्यातील २ अपत्य हे २८ मार्च २००५ नंतरचे आहेत.
तर शिक्षक पत्नी छाया गजानन सातपुते यांचे दोन विवाह झाले असून त्यांना ३ अपत्य आहेत. त्यातील एक अपत्य २८ मार्च २००५ नंतरचे असल्याचे समोर आले आहे.
दोघांवर आहेत गुन्हे दाखल
सातपुते शिक्षक दाम्पत्यांना दोन पेक्षा जास्त मुले आहेत. शिवाय त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल आहेत. त्यामुळे प्रशासनाची प्रतिमा मलिन झाल्याने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने गटविकास अधिकारी यांनी गजानन व छाया सातपुते या शिक्षक दाम्पत्याला निलंबित कारण्याचे आदेश काढले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज