टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुका क्रीडा संकुल म्हणून सध्या इंग्लिश स्कूल प्रशालीमध्ये शासनाकडून कबड्डी खो-खो हँडबॉल बॅडमिंटन आधी क्रीडा प्रकारासाठी हे क्रीडा संकुल उपयोगात आणले जात आहे.
परंतु या ठिकाणी 400 मीटरचा धावणे मार्ग नाही, जलतरण तलाव नाही, याशिवाय क्रिकेट हॉकी आदी खेळासाठी पुरेसे मैदान उपलब्ध नाही.
यामुळे मंगळवेढा तालुका क्रीडा संकुल नव्याने उभा करण्यासाठी आमदार समाधान अवताडे प्रयत्नशील आहेत. त्यांच्यासमोर कुंभार तलावाच्या पाठीमागील चार एकर जागेमध्ये क्रीडा संकुल उभा करण्याचे प्रस्ताव आणण्यात आले असून सध्या तरी याच ठिकाणी क्रीडा संकुल उभा करण्याचे प्रयत्न होत आहेत.
परंतु मंगळवेढा तालुका क्रीडा संकुल म्हणून जुना मारा पुरस्त्याला कृष्ण तलावा लागत सुमारे 15 एकर जागेवर आरक्षण करून या ठिकाणी क्रीडा संकुल उभारले तर सोलापूरच्या पार्क स्टेडियम पेक्षा भव्य सुसज्ज असे स्टेडियम भविष्यात या ठिकाणी उभा राहू शकते.
सोलापूर जिल्ह्यात एकाही ठिकाणी क्रीडा संकुल भव्य स्वरूपात नाही परंतु मंगळवेढ्यात या ठिकाणी क्रीडा संकुल उभा केले तर राज्यस्तरीय नव्हे तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होऊ शकतात.
मंगळवेढा तालुक्यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू खेळाडूंची खाण आहे भाग्यश्री बिले ,सविता बिराजदार, श्याम पाटील ,शैलजा करंदीकर, चंद्रकांत भुसे , महादेव कसगावडे आधी एक नव्हे पन्नासहून अधिक नावे राष्ट्रीय पातळीवर खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवलेले आहेत.
जलतरण तलाव नसताना सुद्धा मंगळवेढेकरांनी राष्ट्रीय पातळीपर्यंत यश मिळवले आहे अशा परिस्थितीत आमदार समाधान आवताडे यांनी भविष्याचा विचार करून मंगळवेढा शहरालगत कृष्ण तलावालगत 45 एकर क्षेत्र शासकीय मालकीचे आहे.
त्या ठिकाणी ती 15 एकर जागा तहसीलदार ,प्रांत कार्यालय यांच्याकडून उपलब्ध करून क्रीडा विभागाकडे प्रस्ताव पाठवला तर विद्यमान क्रीडा उपसंचालक हे मंगळवेढ्याचे आहेत .
स्वतः आमदार समाधानदादा अवताडे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,क्रीडामंत्री यांच्याशी वैयक्तिक संबंध आहेत यामुळे मंगळवेढा तालुक्यात सुसज्ज असे क्रीडा संकुल उभा राहू शकते चार कोटी रुपये उपलब्ध होऊ शकतात.
सध्या बबनदादा शिंदे यांनी चार कोटी रुपये उपलब्ध केले आहेत आमदार समाधानदादा अवताडे हे स्वतः कुस्ती फोटो आहेत त्यांना खेळाचे चांगले ज्ञान आहे खेळाडू बद्दल खेळाबद्दल अस्था आहे.
मंगळवेढा तालुक्याचा भविष्याचा विचार करून ते मंगळवेढा शहरालगत असलेल्या जुना मारापुर रोडला भव्य क्रीडा नगरी सहज उभा करू शकतात यासाठी प्राध्यापक येताला भगत, प्राध्यापक रामचंद्र दत्तू , प्रा रामचंद्र पवार,
प्रा डी के दत्तू , प्रा. राजाराम जगताप, प्रा सुनील नागाने यांच्यासह अनेक क्रीडा प्रशिक्षकांनी त्यांना पंधरा एकर जागेवर क्रीडा संकुल उभा करण्यासाठी आग्रह करण्याची गरज आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज