टीम मंगळवेढा टाईम्स।
शासनाने निर्धारित केलेल्या दरापेक्षा जास्त किमतीने युरिया खताची विक्री करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करणाऱ्या हुन्नूर येथील एका कृषी सेवा केंद्रावर अखेर प्रशासकीय बडगा उगारण्यात आला आहे.
मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर येथील ‘मे.गोवर्धन कृषी सेवा केंद्र’ आणि त्याचे चालक गोवर्धन एकनाथ होळकर यांच्याविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे खत निरीक्षक हरिदास भीमराव बोंगे यांनी १४ जानेवारी २०२६ रोजी हुन्नूर येथील गोवर्धन कृषी सेवा केंद्राची अचानक तपासणी केली होती. या तपासणी दरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.
जादा दराने विक्री: युरिया खताची चढ्या दराने विक्री केल्याचे देयकांवरून (बिलांवरून) सिद्ध झाले.

साठ्यात तफावत: दुकानातील प्रत्यक्ष साठा आणि ‘ई-पॉस’ (e-POS) मशीनवरील साठा यात मोठी तफावत आढळली.
अपूर्ण रेकॉर्ड: साठा पुस्तक अद्ययावत नसल्याचेही निदर्शनास आले.

सुनावणीला दांडी अन् कारवाईचा बडगा
या गैरप्रकाराबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर यांच्याकडे सुनावणी ठेवण्यात आली होती. ६ मार्च आणि १५ एप्रिल अशा दोन वेळा संधी देऊनही दुकान चालक सुनावणीस अनुपस्थित राहिला. अखेर या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिले.

खत निरीक्षक हरिदास बोंगे यांच्या फिर्यादीनुसार, खत नियंत्रण आदेश १९८५ मधील खंड ३(३) आणि जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या कलम ३(२)C व ७(१)(a)(ii) नुसार गोवर्धन एकनाथ होळकर यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
प्रशासनाचा इशारा
शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या कोणत्याही कृषी सेवा केंद्राची गय केली जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा कृषी विभागाने दिला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










