mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शाळांमधून ‘या’ साहित्य खरेदीची सक्ती करू नका; अन्यथा कारवाई, शिक्षण विभागाचा कडक इशारा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 20, 2026
in राज्य, शैक्षणिक
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।

राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून किंवा शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती करू नये, असे कडक निर्देश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत.

शासनाच्या ११ जून २००४ च्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी आणि

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ.महेश पालकर यांनी दिले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कडक कारवाई करण्याचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.

खाजगी प्रकाशनांच्या पुस्तकांना चाप

राज्य मंडळ, सीबीएसई आणि आयसीएसई मंडळाच्या शाळांनी केवळ एनसीईआरटी किंवा एससीईआरटी (बालभारती) द्वारे प्रमाणित केलेली पाठ्यपुस्तकेच वापरणे बंधनकारक आहे.

कोणत्याही शाळेला विद्यार्थ्यांवर विशिष्ट खाजगी प्रकाशनांची महागडी पुस्तके खरेदी करण्याची सक्ती करता येणार नाही. पालकांच्या खिशाला कात्री लावणाऱ्या अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी शिक्षण विभागाने हे पाऊल उचलले आहे.

शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव अनिवार्य

सर्व खाजगी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील ‘शाळा व्यवस्थापन समिती’मध्ये या विषयावर तातडीने चर्चा करून, “विशिष्ट दुकानातून खरेदीची सक्ती केली जाणार नाही” असा ठराव मंजूर करणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. या निर्णयामुळे शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार आहे.

तक्रारीसाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक

जर एखाद्या शाळेने साहित्य खरेदीसाठी पालकांवर दबाव आणला, तर त्याविरोधात दाद मागण्यासाठी शिक्षण विभागाने विशेष व्यवस्था केली आहे. प्रत्येक शिक्षण विभागाने तक्रारी स्वीकारण्यासाठी स्वतःचा अधिकृत ईमेल आयडी प्रसिद्ध करावा.

तक्रारींचे निवारण करण्यासाठी विशेष नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. तक्रारी प्राप्त झाल्यास शिक्षण अधिकारी किंवा प्रशासन अधिकारी त्याची शहानिशा करतील आणि तथ्य आढळल्यास संबंधित शाळेवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

पालकांनो, तक्रार करा

शाळांच्या अशा सक्तीमुळे पालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत पालकांनी घाबरून न जाता शिक्षण विभागाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या निर्णयाची व्यापक प्रसिद्धी करून प्रत्येक शाळेपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचे आदेशही क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: शाळेत शैक्षणिक साहित्य

संबंधित बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खपवून घेणार नाही! एफडीएचा शाळांना शेवटचा अल्टीमेटम; शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विकल्यास थेट कारवाई; तुकाराम मुंढेंची शाळांवर थेट धाड

July 30, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

‘एकतर मी जाईन, नाहीतर सरकार…’; मराठा आरक्षणासाठी जरागेंचा निर्णायक एल्गार, ‘या’ तारखेला जरांगेंचं अखेरचं आंदोलन

July 30, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

ब्रेकींग! ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या ‘कास्ट व्हॅलिडिटी’बद्दल सरकारने घेतला मोठा निर्णय

July 29, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

मंगळवेढ्यासाठी दुःखद बातमी! कोकणात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

July 29, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणार; ‘या’ तारखेची मतदार यादी स्थगित? पाहा नवीन वेळापत्रक

July 27, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

शेतकरी कर्जमुक्ती योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ तारखेपर्यंत पैसे जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; योजनेतील प्रमाणपत्रप्राप्त शेतकरी

July 25, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

बळीराजाला मोठा दिलासा! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ चार गावांतील शेतकऱ्यांना पांडुरंग पावला; कर्जमाफीच्या पहिल्या यादीमध्ये २१ शेतकऱ्यांचा समावेश

July 23, 2026
पंढरीतील महाआरोग्य शिबिरात ५००० वैद्यकीय कर्मचारी वारकऱ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध असणार; आरोग्यमंत्री सावंत यांची संकल्पना

पंढरीत वारकरी आता ‘स्मार्ट’ सुरक्षेत! भाविकांच्या मदतीसाठी ‘या’ ठिकाणी ‘तीर्थक्षेत्र पोलिस मदत केंद्र; वारकऱ्यांच्या सेवेला पोलिसांची साथ

July 22, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

देवस्थान लुटलं! ‘या’ मंदिरात तब्बल 60 कोटींचा महाघोटाळा; तपासासाठी आलेल्या महिला ऑफिसरने मारला डल्ला

July 22, 2026
Next Post
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

बनावट दस्तऐवज तयार करून पतसंस्थेत साडेसहा कोटींचा अपहार; ३६ जणांवर फसवणुकीचा गुन्हा; अशी झाली फसवणूक?

ताज्या बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खपवून घेणार नाही! एफडीएचा शाळांना शेवटचा अल्टीमेटम; शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विकल्यास थेट कारवाई; तुकाराम मुंढेंची शाळांवर थेट धाड

July 30, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

‘एकतर मी जाईन, नाहीतर सरकार…’; मराठा आरक्षणासाठी जरागेंचा निर्णायक एल्गार, ‘या’ तारखेला जरांगेंचं अखेरचं आंदोलन

July 30, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

ब्रेकींग! ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या ‘कास्ट व्हॅलिडिटी’बद्दल सरकारने घेतला मोठा निर्णय

July 29, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

मंगळवेढ्यासाठी दुःखद बातमी! कोकणात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

July 29, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

प्रशासनाचा मोठा निर्णय! सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे विभाजन; जाणून घ्या तुमच्या भागातील नवीन उपविभाग; नागरिक व भाविकांना कसा होणार फायदा?

July 28, 2026
जयश्री महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

वाटचाल सोनपावलांची! जयश्री महिला अर्बन बँकेचा आज पहिला वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व ६ वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

July 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा