टीम मंगळवेढा टाईम्स।
वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली सोलापुरातील नामांकित डॉक्टर नितीन तोष्णीवाल यांच्यावर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमर हिंदुराव अडसुळ (वय ३२, रा.सुस्ते, ता.पंढरपूर, जि.सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डॉ.नितीन तोष्णीवाल यांच्यावर भा.दं.वि.क. ३०४ (अ) नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
अडसूळ यांनी तब्बल सहा महिन्यांनंतर हा गुन्हा दाखल केला आहे. दि.१५ जानेवारी ते दि.१८ जानेवारीच्या दरम्यान हिंदुराव अडसूळ हे नवनीत हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होते.
फिर्यादीचे वडील हिंदुराव अडसूळ हे घरी असताना त्यांना चक्कर येऊन त्रास होत असल्याने गावाकडील डॉ.सालविठ्ठल यांच्याकडे प्राथमिक उपचार घेतले व त्यांच्या सांगण्यावरुन
तसेच डॉ.तोष्णीवाल यांना फोन करून माहिती दिल्यानंतर फिर्यादीने त्यांच्या वडिलांना नवनीत हॉस्पिटल येथे पुढील उपचारास दाखल केले.
त्यानंतर फिर्यादीच्या वडिलांना आयसीयूमध्ये भरती केले असता, फिर्यादीस त्यांच्या वडिलांना भेटण्यास देण्यात आले नाही.
तसेच डॉ.संग्राम यांनी फिर्यादीस बोलावून घेऊन सांगितले की , पेशंट फार सिरीयस आहे त्यांना डायलेसीसची गरज आहे, असे सांगितल्यानंतर डॉ.राठोड व डॉ. पैकी यांनी फिर्यादीस सांगितले की पेशंटच्या किडणीचे क्रिएटीन वाढले आहे.
त्यामुळे लंग्स व हृदयावर दाब वाढत आहे. त्यांना डायलेसीस करण्यास सुरुवात करीत आहोत. त्यानुसार डॉक्टरांनी डायलेसीस सुरु केले. त्यावेळी देखील डॉ.तोष्णीवाल आले नाहीत.
पुन्हा फिर्यादीस बोलावून डॉक्टरांनी सांगितले की, डायलेसीस प्रक्रिया पूर्ण झाली असून क्रिएटीन कमी झाले आहे. थोडा वेळ वाट पाहू , पुन्हा डायलेसीस करू , असे सांगितले.
तरी परंतु पेशंट गंभीर आहे असे सांगितले. त्यानंतर डायलेसीसची प्रक्रिया सुरु करताना फिर्यादीस बोलावून स्क्रिनवर फिर्यादीचे वडील अतिशय सिरीयस असून पंपींग करणे सुरु असल्याचे दाखविले. त्यात फिर्यादीचे वडील हे मृत झाले आहेत.
त्यानंतर फिर्यादीने हॉस्पिटलचा बिल भरणा करुन फिर्यादीचे वडील हिंदुराव गोवर्धन अडसुळ यांच्यावर करण्यात आलेले उपचार वेळेवर न करण्यात आल्याचे व पूर्णपणे आजारास
अनुसरुन न केल्याचे फिर्यादीच्या वडिलांचे मृत्यूस डॉ.नितीन तोष्णीवाल यांचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याने मृत झाले आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड हे करीत आहेत.(स्रोत:पुण्यनगरी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज