टीम मंगळवेढा टाईम्स।
भरधाव जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात किराणा दुकानासमोर थांबलेल्या चौघा प्रवाशांना चिरडल्याने आजी व नातूचा जागीच मृत्यू झाला.
तर तिघेजण जखमी झाले. हा अपघात रविवारी सायंकाळी ४ च्या सुमारास चिकमहूद- दिघंची रोडवरील शेरेवाडी कटफळ ता. (सांगोला) येथे घडला.
द्रौपदी शिवाजी आटपाडकर (वय ५०) व सिद्धेश्वर नामदेव काळेल (वय द्रौपदी आटपाडकर सिद्धेश्वर काळेल ७, रा. कटफळ आटपाडकर वस्ती) असे मृत आजी व नातूचे नाव आहे,
तर नामदेव सदाशिव काळेल (वय ३५) व रुक्मिणी नामदेव काळेल (वय ३०) तसेच पिकअप चालक विष्णू बळीराम मँगाने जाधव (रा. शिंगोर्णी, ता. माळशिरस) अशी जखमींची नावे आहेत.
कटफळ आटपाडकर वस्ती येथील नामदेव सिद्धेश्वर काळेल, रुक्मिणी नामदेव काळेल व सिद्धेश्वर नामदेव काळेल असे तिघेजण मिळून वसईला जाण्यासाठी बसची वाट पाहत शेरेवाडी येथील किराणा दुकानासमोर सावलीला थांबले होते तर द्रौपदी आटपाडकर या वरील तिघांना सोडण्यासाठी त्यांच्यासमवेत आल्या होत्या.
त्यादरम्यान भोसे (ता. पंढरपूर) येथील बाळासाहेब माळी यांचा पुतण्या, सून, भाऊ व भावजय असे सर्वजण मिळून कारमधून महूद मार्गे आटपाडीकडे निघाले होते.
त्यादरम्यान कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने अगोदर समोरील पिकअपला उजव्या बाजूने जोराची धडक देऊन दुकानासमोर थांबलेल्या चौघा प्रवाशांना चिरडून कार तशीच पुढे दुकानात जाऊन घुसल्याने हा भीषण अपघात घडला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज