टीम मंगळवेढा टाईम्स ।
एका २३ वर्षीय महिलेचा निघृणपणे खून करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास पोंधवडी-राजुरी रस्त्यावरील वस्तीवर घडली. मृत कोमल बिभीषण मत्रे (वय २३,रा. पोंधवडी ता.करमाळा) असे महिलेचे नाव आहे.
कोमलचा विवाह गावातीलच मत्रे कुटुंबात झाला होता. मागील तीन वर्षांपासून कौटुंबिक कलहातून ती माहेरीच राहत होती. मंगळवारी रात्री अज्ञात काही हल्लेखोर कोमलच्या घरी आले.
सुरुवातीला त्यांनी दरोड्याचा बनाव केला व कोमलवर निघृणपणे धारदार शस्त्राने हल्ला केला. त्या हल्ल्यात ती जागीच ठार झाली. मृत महिलेला एक लहान मूल आहे.
या ठिकाणाहून पळून जात असताना हल्लेखोरांच्या ताब्यात असलेली दुचाकी पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामुळे हल्लेखोर लवकरच मिळून येण्याची शक्यता आहे.
सहायक पोलिस निरीक्षक रोहित शिंदे, पोलिस उपनिरीक्षक दळवी, हवलदार बालाजी घोरपडे, अझहर शेख यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली आहे. घटना रात्री उशिरा समजल्याने गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज