mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

“एक दिवस पालकांचीच शाळा” हा प्रायमाचा अनोखा उपक्रम

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 12, 2020
in Uncategorized, मंगळवेढा

मंगळवेढा : समाधान फुगारे

मंगळवेढा  प्रायमा पूर्व प्राथमिक विद्यालयाने “एक दिवस पालकांचीच शाळा” हा अनोखा उपक्रम मंगळवार दि.११ रोजी केला. या दिवशी प्रायमामध्ये प्रवेश घेतलेल्या सर्वच मुलां-मुलींना सुट्टी देऊन त्यादिवशी मुलां-मुलींच्या माता पालक यांचीच विद्यार्थ्याप्रमाणे शाळा भरवली. यास पालकांनी उत्स्फुर्त असा प्रतिसाद दिला. या अनोख्या उपक्रमाचे पालकांनी स्वागत आणि कौतुक केले. प्रायमा नेहमीच मुलांच्या सोबत पालकांनाही प्रत्येक कार्यक्रमात सहभागी करुन घेते आणि नवनवीन उपक्रम यशस्वी करते म्हणून पालकांना प्रायमाबद्दल आकर्षण होत आहे.

           वर्षभरात विद्यार्थ्यांची शाळा भरतच असते, परंतु प्रायमा पूर्व प्राथमिक विद्यालयामध्ये चक्क पालकांचीच शाळा भरली. एक दिवस माता पालकच शाळेत विद्यार्थी म्हणून येणार होते म्हणून त्याच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आलेली होती. प्रवेशव्दारात रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर मुलांचा दररोज ज्या पध्दतीने राष्ट्रगीत, वंदे मातरम, प्रतिज्ञा, परिपाठ इत्यादी घेतला जातो अगदी त्याचप्रमाणे माता पालक यांना हे उपक्रम  घेण्यात आले.

यावेळी सरस्वती नमन, प्रार्थना, राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, संविधान, मंगळवारचे भजन, कराग्रे वसती, हे प्रभु, गणपती स्त्रोत्र, आईची प्रार्थना, संस्कार प्रार्थना, देव जेवला, कवायत प्रकार, शाळेच्या दारात, आनंददायी, चिलमुला चिलमुला, आई बाबा तुम्ही!, हातात माझ्या जादू हे गीत माता पालकांच्याकडून करुन घेतले. आणि त्यांची मुले-मुली हे दररोज म्हणतात म्हणून घरी गेल्यानंतरही हेच म्हणून दाखवितात असे पालकांनी सांगितले.

यावेळी मुलां-मुलींना बाराखडी, चौदाखडीच्या सोबतच एकोणीसखडी शिकविली जात असून एकोणीसखडीचे कृतिशील पध्दतीने सर्वच शिक्षिकांनी माता पालकांना प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात आले. यामुळेच मुलांना अक्षरांची ओळख निर्माण होते. अक्षरांची ओळख किंवा अक्षरांशी मैत्री झाल्याशिवाय मुले अभ्यास करत नसतात म्हणून मुलांच्यामध्ये प्रथम अभ्यासाची आवड निर्माण केली जाते.  एकोणीसखडी शिकविण्यामुळे अंगणवाडी, बालवडीमधील मुले इयत्ता पाचवी ते बारावीच्या मुलांप्रमाणे अक्षरवाचन सहज करु शकतात. फक्त प्रायमा पूर्व प्राथमिक विद्यालयातील मुलांनाच बाराखडी, चौदाखडी सोबत एकोणीसखडीचे देखील प्रशिक्षण देत असल्यामुळे माता पालकांनी समाधान व्यक्त केले.

त्यानंतर प्रत्येक माता पालक आपापल्या मुलांच्या वर्गात म्हणजे शिशु, लहान, मोठा गट या वर्गाप्रमाणे वर्गात जाऊन बसले. त्याचवेळी त्यांनी त्यांची लहानपणीची शाळा, ते वर्ग, शिक्षक आठवण्याचा प्रयत्न केला. ज्या त्या वर्गातील गट शिक्षिकांनी त्यांच्या गटाप्रमाणे अभ्यास घेतला. वर्गातील प्रोजेक्टर, डिजिटल बोर्डवर, टी.व्ही. चालू करुन मुलांना अभ्यासक्रमातील नेमका कोणता भाग यावर शिकविला जातो याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यामुळे माता पालकांच्यामध्ये एक उत्साह दिसून येत होता. आपण आपल्या मुलांना प्रायमामध्ये प्रवेश दिलेल्याचे सार्थक होत आहे असे व्यक्त केले.

         ‘एक दिवस पालकांची शाळा’ या उपक्रमात मुलांना दररोज दाखविण्यात येणाऱ्या ई-लर्निंगमध्ये शालेय शिक्षणाबरोबरच समाजातील सामाजिक, मानसिक व शारीरिक शिक्षणाचेही महत्त्व, विविध किल्ले-गड यांची माहिती, इंग्रजी, मराठी भाषेचा अभ्यास, बडबडगीते, इंग्रजी कविता इत्यादी पालकांना दाखविण्यात आले. मुलांमधील असणारे उपजत सुप्त कलागुणांना चेतना देऊन समाजाभिमुख नागरिक निर्माण करता येतील असे मत प्रायमा संस्थेच्या सचिवा वैशाली कुंभार यांनी व्यक्त केले. याशिवाय मुलांना धाकात, दडपणात ठेवून केवळ अभ्यास करवून न घेता खेळण्याला, इतर कलाशिक्षणालाही तितकेच महत्त्व देण्याचे आवाहन त्यांनी केले.

           प्रायमाच्या एक दिवस पालकांची शाळा मधील विद्यार्थी म्हणजेच माता पालक यांनी आजच्या घेतलेल्या उपक्रमामुळे खरोखरच मानसिक समाधान मिळाले. आमची मुलं खरोखरीच गुणी आहे. प्रायमा मध्ये मुलांना प्रवेश दिल्यामुळे मुलांचा शैक्षणिक पाया तर मजबूत होणारच आहे. याशिवाय मुलांच्यावर चांगले संस्कार घडविले जातात याचा आम्हांला  सार्थ अभिमान आहे. वर्षभरात प्रायमाने मुला-मुलींच्या सोबत पालकांना देखील एक आगळा वेगळा आनोखा असा आनंद आज दिलेला आहे. हा आनंद आम्ही कधीच विसरु शकत नाही असे मत सर्वच माता पालकांनी व्यक्त केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रायमाचे अध्यक्ष नीलकंठ कुंभार, संस्थेच्या सचिवा वैशाली कुंभार, संचालिका ईशा पटवर्धन यांच्या मार्गदर्शना खाली प्रशालेच्या शिक्षिका सविता रत्नपारखी, लता कुलकर्णी, सारिका चव्हाण, अश्विनी टाकणे, पूजा ढोणे, सुनिता कुंभार, निता डोके, स्वाती माळी, गीता गुंगे, वैशाली खांडेकर, राधिका भगत, सुजाता मुदगूल, शिला पलंगे, सुजाता चिंचकर, गजानन कसगावडे आणि महत्वाचा दुवा असणारे माता पालक यांनी परिश्रम घेतले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: MangalWedhaManoranjan

संबंधित बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मोठी खळबळ! मंगळवेढ्यात २६ वर्षीय विवाहित महिलेचे टोकाचे पाऊल; स्वयंपाक खोलीत ओढणीने घेतला गळफास; आत्महत्येचे कारण…

August 7, 2026
​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

मंगळवेढ्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या ७१ वर्षीय महिलेचे सोन्याचे गंठण लांबवले; महिनाभरात दुसरी घटना, महिलांमध्ये घबराट

August 7, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

​मंगळवेढा हादरला! मुदतबाह्य दही, ताक आणि लस्सी बाजारात; ‘या’ दूध डेअरीवर एफडीएचा सर्जिकल स्ट्राईक; ​तुकाराम मुंढेचा दणका

August 7, 2026
स्वप्नातील घरासाठी नागरिकांची तुफान पसंती; ‘दामाजी सिटी’ ठरतेय मंगळवेढ्यातील पहिली पसंती; भरघोस प्रतिसादानंतर अंतिम टप्प्यात बुकिंग; 9890605962 आजच संपर्क साधा

स्वप्नातील घरासाठी नागरिकांची तुफान पसंती; ‘दामाजी सिटी’ ठरतेय मंगळवेढ्यातील पहिली पसंती; भरघोस प्रतिसादानंतर अंतिम टप्प्यात बुकिंग; 9890605962 आजच संपर्क साधा

August 6, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

मंगळवेढ्यात कर्जमाफीचा मोठा धमाका! ‘त्या’ एकाच गावातील ३५६ शेतकऱ्यांना जॅकपॉट

August 5, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट! बसमध्ये चढणाऱ्या महिला प्रवाशाचे ४३ हजार लांबवले; मंगळवेढा बसस्थानकावरील CCTV कॅमेरे पडले बिनकामी

August 1, 2026
गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

July 31, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

राजकीय पार्श्वभूमी आहे म्हणून सूट मिळणार नाही! मंगळवेढा न्यायालयात आरोपीला ३ वर्षांची ठोकली शिक्षा

July 31, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

मंगळवेढ्यासाठी दुःखद बातमी! कोकणात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

July 29, 2026
Next Post
‘मद्यप्रेमींचा प्याला’ होणार महाग? बाटलीमागे १० रु. हरित कर

'मद्यप्रेमींचा प्याला' होणार महाग? बाटलीमागे १० रु. हरित कर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मोठी खळबळ! मंगळवेढ्यात २६ वर्षीय विवाहित महिलेचे टोकाचे पाऊल; स्वयंपाक खोलीत ओढणीने घेतला गळफास; आत्महत्येचे कारण…

August 7, 2026
​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

मंगळवेढ्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या ७१ वर्षीय महिलेचे सोन्याचे गंठण लांबवले; महिनाभरात दुसरी घटना, महिलांमध्ये घबराट

August 7, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

​मंगळवेढा हादरला! मुदतबाह्य दही, ताक आणि लस्सी बाजारात; ‘या’ दूध डेअरीवर एफडीएचा सर्जिकल स्ट्राईक; ​तुकाराम मुंढेचा दणका

August 7, 2026
स्वप्नातील घरासाठी नागरिकांची तुफान पसंती; ‘दामाजी सिटी’ ठरतेय मंगळवेढ्यातील पहिली पसंती; भरघोस प्रतिसादानंतर अंतिम टप्प्यात बुकिंग; 9890605962 आजच संपर्क साधा

स्वप्नातील घरासाठी नागरिकांची तुफान पसंती; ‘दामाजी सिटी’ ठरतेय मंगळवेढ्यातील पहिली पसंती; भरघोस प्रतिसादानंतर अंतिम टप्प्यात बुकिंग; 9890605962 आजच संपर्क साधा

August 6, 2026
ग्रामीण भागातून रक्त संकलन करणे ही काळाची गरज – तृप्तीताई राजू खरे; राजेंद्र फुगारे यांच्या वाढदिवशी भव्य रक्तदान शिबिर

ग्रामीण भागातून रक्त संकलन करणे ही काळाची गरज – तृप्तीताई राजू खरे; राजेंद्र फुगारे यांच्या वाढदिवशी भव्य रक्तदान शिबिर

August 6, 2026
आधारकार्ड घरी मागवून घेण्यासाठी फक्त 50 रुपये शुल्क भरावे लागणार

मतदारांना मोठी दिलासादायक बातमी! ‘एसआयआर’ अभियानासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ; सुधारित वेळापत्रक जाहीर

August 6, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..