mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

‘मद्यप्रेमींचा प्याला’ होणार महाग? बाटलीमागे १० रु. हरित कर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 12, 2020
in Uncategorized, मंगळवेढा
‘मद्यप्रेमींचा प्याला’ होणार महाग? बाटलीमागे १० रु. हरित कर

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

राज्य सरकारने उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळ्या मार्गांची चाचपणी सुरू केली असून त्याचाच एक भाग म्हणून भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या बाटलीवर प्रत्येकी दहा रुपये हरित कर आकारण्याचा विचार चालवला आहे. साहजिकच हा निर्णय अंमलात आला. तर मद्यप्रेमींचा प्याला महाग होऊ शकतो. साधारणपणे या प्रकारच्या मद्याच्या 125 कोटी बाटल्या दरवर्षी राज्यात विकल्या जातात.

राज्यात असणारे मद्यावरील उत्पादन शुल्क देशात सर्वाधिक आहे. त्यामुळे इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात मद्य महाग आहे. परिणामी शेजारील राज्यातून मद्याच्या तस्करीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सरकारचे उत्पन्न बुडत आहे.

आयात केलेल्या विदेशी मद्याच्या महागड्या ब्रँडवर राज्यात दोन ते तीन हजार रुपये उत्पादन शुल्क आकारले जाते. अनेक राज्यांमध्ये हे शुल्क 1 हजार रुपयांपेक्षाही कमी आहे. कर्नाटक, उत्तर प्रदेश, तामिळनाडू तसेच नवी दिल्ली या राज्यांमध्ये आकारले जाणारे उत्पादन शुल्क महाराष्ट्रापेक्षा कितीतरी कमी आहे. त्यामुळे सध्या आकारल्या जाणार्‍या उत्पादन शुल्कात काही बदल करता येईल का, यावर विचार सुरू आहे. उत्पादन शुल्क कमी झाले तर राज्यात मद्यविक्री वाढून सरकारला अतिरिक्त महसूल मिळू शकतो. 

तसेच हे शुल्क कमी करून जर सरकारचे नुकसान होत असेल तर प्रस्तावित हरित करामुळे हे उत्पन्न वाढू शकते, असे उत्पादन शुल्कच्या विभागाचे वरिष्ठ अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

अनेक राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये असलेले देशी दारूच्या दुकानांचे प्रमाणही कमी आहे. उत्तरप्रदेशात सध्या अशी 14 हजार दुकाने आहेत. त्यापासून त्या सरकारला 29 हजार कोटींचा महसूल मिळतो. हाच महसूल तामिळनाडूमध्ये 33 हजार आंध्र आणि तेलंगणामध्ये 38 हजार कोटी इतका आहे. महाराष्ट्रात देशी दारूची केवळ 4 हजार तर विदेशी बनावटीच्या दारूची केवळ 1400 दुकाने आहे. 1974 नंतर अशा कोणत्याही दुकानाला परवानगी दिलेली नाही. तसेच वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे दारूबंदी आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsMaharashtra Maza

संबंधित बातम्या

​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

June 21, 2026
३ वर्षांचं वय अन् काळजाचा थरकाप उडवणारा विक्रम! पोलीस पुत्राने १४ पायऱ्यांची उभी भिंत चढून जाज्वल्य डोरलेचा ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये इतिहास रचला

३ वर्षांचं वय अन् काळजाचा थरकाप उडवणारा विक्रम! पोलीस पुत्राने १४ पायऱ्यांची उभी भिंत चढून जाज्वल्य डोरलेचा ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये इतिहास रचला

June 21, 2026
मंगळवेढेकरांनो! दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालय व इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन; ‘ही’ प्रसिद्ध सिनेअभिनेत्रीची असणार उपस्थिती

दहावीच्या निकालात मोठा उलटफेर! पुनर्मूल्यांकनानंतर मंगळवेढ्याची पाटील महाराष्ट्रात सर्वप्रथम; मंगळवेढा इंग्लिश स्कूलच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

June 20, 2026
‘चांगले दिवस येणार होते, पण तू सोडून गेलीस…’ रीलस्टार रोहिणी पारध्ये आत्महत्येप्रकरण; पतीची पहिली पोस्ट चर्चेत, नेमके कारण काय?

स्क्रीनवर लाखो फॉलोअर्स, पण खऱ्या आयुष्यात नरकयातना! रिल स्टार रोहिणी पाराध्येच्या मृत्यूचा खरा विलन अखेर समोर; मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 20, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

ब्रेकिंग! सुसाट कंटेनरने दुचाकी उडवली मंगळवेवेढ्यातील शिवसेनेचा आक्रमक आणि निष्ठावंत चेहरा काळाच्या पडद्याआड

June 18, 2026
धक्कादायक! मंगळवेढा येथून अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल

माणुसकीला काळीमा! अवघ्या ३ वर्षांच्या बालिकेचा विनयभंग; मंगळवेढ्यात संताप, १७ वर्षीय नराधम पोलिसांच्या ताब्यात

June 17, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढेकरांनो सावधान! नळाला कॉक लावा, अन्यथा थेट दंडात्मक कारवाई; नगरपरिषदेचा कडक इशारा

June 18, 2026
शिक्षणाचा नवा पॅटर्न! डोंगरगावात ‘वीर अकॅडमी’ सुरू; उद्घाटन सोहळ्याला मान्यवरांची मांदियाळी

शिक्षणाचा नवा पॅटर्न! डोंगरगावात ‘वीर अकॅडमी’ सुरू; उद्घाटन सोहळ्याला मान्यवरांची मांदियाळी

June 16, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

जिल्हा परिषद शाळा बळकटीकरणासाठी डोंगरगावच्या सुपुत्राचे स्तुत्य पाऊल; वीर इंटरनॅशनल अकॅडमीचा आज भव्य उद्घाटन सोहळा

June 16, 2026
Next Post
मोफत वीजच कारभार आंधळा ठरणार असल्याची भीती

मोफत वीजच कारभार आंधळा ठरणार असल्याची भीती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

June 21, 2026
३ वर्षांचं वय अन् काळजाचा थरकाप उडवणारा विक्रम! पोलीस पुत्राने १४ पायऱ्यांची उभी भिंत चढून जाज्वल्य डोरलेचा ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये इतिहास रचला

३ वर्षांचं वय अन् काळजाचा थरकाप उडवणारा विक्रम! पोलीस पुत्राने १४ पायऱ्यांची उभी भिंत चढून जाज्वल्य डोरलेचा ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये इतिहास रचला

June 21, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

शेतकऱ्यांच्या संयमाचा विजय! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात शेतीसाठी मिळणार आता आठ तास वीज; ‘टाळे ठोकू’ इशाऱ्याची प्रशासनाने घेतली धडक दखल

June 21, 2026
मंगळवेढेकरांनो! दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालय व इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन; ‘ही’ प्रसिद्ध सिनेअभिनेत्रीची असणार उपस्थिती

दहावीच्या निकालात मोठा उलटफेर! पुनर्मूल्यांकनानंतर मंगळवेढ्याची पाटील महाराष्ट्रात सर्वप्रथम; मंगळवेढा इंग्लिश स्कूलच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

June 20, 2026
धक्कादायक! ज्या रुग्णालयात हजारो रुग्णांवर उपचार केले तिथंच घेतला अखेरचा श्वास; सोलापूरमधील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ.शिरीष वळसंगकर यांनी जीवन संपवलं

सोलापुरात खळबळ! देवमाणूस गेला, पण मागे वादाची ठिणगी पडली; डॉ. वळसंगकर यांच्या कुटुंबातील ‘तो’ वाद अखेर चव्हाट्यावर; पोलिसांसमोर मोठा खुलासा

June 20, 2026
बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

मोठी बातमी! सरकारी जमिनी हडपणाऱ्यांना मोठा दणका… ‘या’ जमिनींवर आता थेट महाराष्ट्र शासनाचे नाव लागणार…;  ‘इतक्या’ महिन्यांचा अल्टीमेटम

June 20, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..