मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । आढीव (ता.पंढरपूर) येथील एका घरामधून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध असलेला दीड लाख रुपये किमतीचा गुटखा व सुगंधित सुपारी जप्त करण्याची कारवाई तालुका पोलिसांनी केली . आढीव विसावा ( ता . पंढरपूर ) येथील कृष्ण बापू डांगे यांच्या राहत्या घरात गुटखा , सुगंधित तंबाखू साठा केला आहे , अशी माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार अवचर यांनी खाजगी वाहनाने पथक त्या ठिकाणी पाठवले . त्यावेळी कष्णा बाप डांगे यांच्या घराची तपासणी केली. त्यावेळी डांगे यांच्या घरात खाकी पुठ्याच्या बॉक्समध्ये गुटखा , सुपारी व सुगंधित तंबाखू सापडली . या कारवाईदरम्यान पकडण्यात आलेल्या सुगंधित सुपारीची किंमत १ लाख ५० हजार रुपये आहे . याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती देण्यात आली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज