मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । देशातील सर्व नागरिकांना कोरोना विषाणूची विनामूल्य चाचणी सुविधा प्रदान करण्यासाठी केंद्र सरकार व संबंधित प्राधिकरणाला निर्देश द्या , अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे . कोगेनाचा वाढत चाललेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर चाचणी करण्याचे निर्देश प्राधिकरणाला देण्यात यावे , अशीही मागणी करण्यात आली आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आयसीएमआरकडून १० मार्च रोजी जारी करण्यात आलेल्या निर्देशावर याचिकेतूना प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत . आयसीएमआरने खासगी रुग्णालयातदेखील कोरोनाच्या चाचणीला मंजुरी देताना ४५०० रुपयांचे शुल्क निर्धारित केले होते. परंतु याचिकेतून सांना मोफत चाचणी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
वकील शशांक देव सुधी यांनी ही याचिका दाखल केलेली आहे . कोरोनाचा वाढता धोका आणि देशातील लोकसंख्या लक्षा । घेता कोगेनाला आळा घालण्यासाठी तातडीची चाचणी हाच एकमेव पर्याय असल्याने याचिकेत म्हटले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज