मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी सुरू आहे . त्याचा गैरफायदा घेऊन जीवनावश्यक वस्तू जादा दराने विक्री करणाऱ्या दोन किराणा दुकान चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , मुलाराम केराजी चौधरी ( वय ४० ) याचे मॉडेल कॉलनीतील गोखले रोड येथे ओम सुपर मार्केट नावाचे किराणा मालाचे दुकान आहे.
गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकातील पोलीस कर्मचारी चतुःशंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते . त्यावेळी शहरात संचारबंदी सुरू असल्याचा गैरफायदा घेऊन चौधरी हा त्याच्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांना जीवनावश्यक वस्तू जादा दराने विक्री करीत असल्याची खबर मिळाली . त्यानुसार , चौधरी याच्या ओम सुपर मार्केट येथे बनावट ग्राहक पाठवून खात्री करण्यात आली.
त्यानंतर त्याच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्याद्वारे चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला . खडकी परिसरातील किराणा दुकानदार मंगेश देवराम चौधरी ( वय ३० ) हा चढ्या दराने किराणा मालाची विक्री करीत असताना आढळून आला . पोलिसांना हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाने त्याच्याविरोधातही खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज