mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

दुष्काळाचे भान, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिर,सर्वधर्मीय सामुदायिक विवाह अन् लेकीच्या जन्माचे स्वागत; आ.समाधान आवताडे यांचा वाढदिवस ठरणार ‘लोकचळवळ’

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 20, 2026
in मंगळवेढा
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

टीम मंगळवेढा टाईम्स । प्रतिनिधी

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळजन्य परिस्थितीचे भान ठेवून सर्वसमावेशक सामाजिक बांधिलकी दृढ करण्याच्या दृष्टिकोनातून अभिष्टचिंतन बडेजाव न करता सर्वसामान्य जनतेच्या आणि शेतकऱ्यांप्रती विविध समाजपयोगी कार्यक्रमांचे आयोजन मतदारसंघामध्ये करण्यात आले असल्याची माहिती वाढदिवस संकल्पक समितीने दिली आहे.

आमदार आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त म्हणजेच शनिवार दिनांक २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजलेपासून मंगळवेढा तालुक्यातील प्रत्येक गावोगावी भव्य स्वच्छता अभियान त्याचबरोबर स्वच्छ गाव सुंदर गाव समृद्ध गाव ही संकल्पना गावोगावी प्रत्यक्ष स्वच्छतेच्या रूपाने राबवली जाणार आहे.

त्याचबरोबर मुली जन्माचे स्वागत करण्याच्या संकल्पनेतून २१  नोव्हेंबर रोजी जन्मास येणाऱ्या प्रत्येक मुलींच्या नावे विशिष्ट रक्कम मोडत ठेवीत जमा करण्यात येणार आहे.

शुक्रवार दिनांक २७ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन या कालावधीत सर्व रोग निदान शिबिर व नेत्र तपासणी चष्मे वाटप हा आरोग्य शिबिराचा कार्यक्रम मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात त त्याचबरोबर बोराळे, सलगर बु, भोसे, आंधळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये राबवला जाणार आहे.

आ.आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याची विवाह नोंदणी दि.21 नोव्हेंबर 2026 पासून 10 मार्च 2027 पर्यंत करण्यात येणार आहे त्यासाठी आमदार आवताडे जनसंपर्क कार्यालय पंढरपूर व मंगळवेढा येथे संपर्क साधण्याचे आवाहन हे करण्यात आले आहे.

यंदा संपूर्ण मतदारसंघांमध्ये दुष्काळाची गडद छाया जमा झाल्याने आमदार समाधान आवताडे यांनी आपल्या हितचिंतकांना तसेच कार्यकर्त्यांना आवाहन करताना सांगितले की, दुष्काळजन्य परिस्थितीमुळे

सर्वसामान्य जनता व शेतकरी खूप मोठ्या अडचणी सापडला असल्यामुळे वाढदिवसानिमित्त कोणताही अवाजवी खर्च न करता त्या खर्चातून शेतकऱ्यांना व मतदारसंघातील जनतेला दिलासा मिळेल असे कार्यक्रम राबवून सामाजिक हिताला प्राधान्य देण्याची आपली मानवतेची भूमिका सर्वांनी पार पाडावी.

त्यांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत मतदार संघातील अनेक गावांमध्ये विविध सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रम कार्यक्रमाचे आयोजन करून आमदार समाधान आवताडे यांना शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

तरी वरील सर्व उपक्रमांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी व शेतकऱ्यांनी सहभागी होऊन या लोकचळवळीस आणखी गतिमान करण्याचे आवाहन अभिष्टचिंतन उपक्रम सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

सामान्य जनतेचे अश्रू असण्यात आणि त्यांच्या सुखदुःखात आपला आनंद व्यक्त करण्याची लोकप्रशासक भूमिका पार पाडणारे आपल्या मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त कोणतेही भव्यशाली कार्यक्रम अथवा हार-तुरे यावर खर्च न करता

सामाजिक व्यवस्थेला अभिप्रेत असे निरनिराळे कार्यक्रम आयोजित करून अभिष्टचिंतन उपक्रम सोहळा समितीने आमदार आवताडे यांना आगळेवेगळे परंतु विधायक मार्गाने शुभेच्छा देण्याचा अवलंब केला आहे.

कार्यक्रमाचे आयोजन आणि त्यांच्या कारकिर्दीतील लोकसंवेदनशीलतेची नेतृत्व भूमिका पाहता त्यांनाही अशा शुभेच्छा मनापासून आवडतील याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे – जनार्धन शिवशरण ( समन्वयक, अभिष्टचिंतन उपक्रम सोहळा समिती)

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

मद्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर चालवणाऱ्या दोघांचा ‘स्टिअरिंग’वरील ताबा सुटण्यापूर्वीच पोलिसांचा दणका; मंगळवेढा पोलिसांची धडक कारवाई; चालकांवर गुन्हे दाखल

November 20, 2026
महिला सक्षमीकरण व आधुनिक बँकिंगचा नवा अध्याय! सलगर बुद्रुक येथे ‘सुवर्णश्री अर्बन’चा उद्या भव्य उद्घाटन समारंभ; ठेवींवर १२% पर्यंत व्याज; अवघ्या १० मिनिटांत प्रति तोळा १.३० लाखांचे सोने तारण कर्ज

महिला सक्षमीकरण व आधुनिक बँकिंगचा नवा अध्याय! सलगर बुद्रुक येथे ‘सुवर्णश्री अर्बन’चा उद्या भव्य उद्घाटन समारंभ; ठेवींवर १२% पर्यंत व्याज; अवघ्या १० मिनिटांत प्रति तोळा १.३० लाखांचे सोने तारण कर्ज

November 18, 2026
मंगळवेढ्यात ‘आवताडे राज’ कायम! बबनरावांच्या ३५ वर्षांच्या वर्चस्वाला सिद्धेश्वर यांच्या बिनविरोध निवडीची झळाळी; जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात ‘साडू भावां’ची दमदार एन्ट्री

मंगळवेढ्यात ‘आवताडे राज’ कायम! बबनरावांच्या ३५ वर्षांच्या वर्चस्वाला सिद्धेश्वर यांच्या बिनविरोध निवडीची झळाळी; जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात ‘साडू भावां’ची दमदार एन्ट्री

November 18, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

‘रोड रेज’चा थरार! गाडीला कट का मारला?’ वादातून मंगळवेढ्यात तरुणाला लाकडी काठीने बेदम मारहाण

November 16, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

वाड्या-वस्त्यांची तहान भागविण्यासाठी सभापती दिपाली ताड मैदानात; छोट्या टँकरने पाठपुराव्याला प्रांताधिकाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद

November 15, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

‘हाताला काम’ देण्यासाठी ‘वॉर रूम’ तयारी; दुष्काळाच्या झळा रोखण्यासाठी मंगळवेढ्यात ८१ ग्रामपंचायतींना जलसंधारणाच्या कामांचा ‘शेल्फ’ तयार ठेवण्याचे आदेश

November 15, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

यात्रेत राडा! डान्स स्पर्धा पाहताना झालेल्या वादातून तरुणाच्या डोक्यात घातला लोखंडी गज; मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

November 14, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

हादरवणारी घटना! मंगळवेढ्यात बेशिस्त ट्रॅक्टर चालकाच्या धडकेत तरुण दुचाकीस्वाराचा मृत्यू; अपघातानंतर चालक वाहन सोडून पसार; गुन्हा दाखल

November 14, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

​भालकेंच्या बालेकिल्ल्यात राजकीय हालचालींना वेग; सरकोलीसाठी आमदार समाधान आवताडे यांनी केल्या मोठ्या घोषणा; राजकारण तापले

November 13, 2026

ताज्या बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

दुष्काळाचे भान, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिर,सर्वधर्मीय सामुदायिक विवाह अन् लेकीच्या जन्माचे स्वागत; आ.समाधान आवताडे यांचा वाढदिवस ठरणार ‘लोकचळवळ’

November 20, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

अलर्ट! चक्रीवादळामुळे महाराष्ट्राचं हवामान बदलणार; ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

November 20, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

मद्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर चालवणाऱ्या दोघांचा ‘स्टिअरिंग’वरील ताबा सुटण्यापूर्वीच पोलिसांचा दणका; मंगळवेढा पोलिसांची धडक कारवाई; चालकांवर गुन्हे दाखल

November 20, 2026

महाराष्ट्रात नवे वेतन नियम लागू! आता ‘इतके’ तासांपेक्षा जास्त काम केल्यास ओव्हरटाईम अन् सुट्टीच्या दिवशी काम केल्यास थेट दुप्पट पैसे मिळणार

November 19, 2026
लाडकी बहीणनंतर लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा खात्यात येणार ‘इतकी’ रक्कम; पंढरपूरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर; प्रशासनाची तारेवरची कसरत; असा असणार दौरा

November 19, 2026
महिला सक्षमीकरण व आधुनिक बँकिंगचा नवा अध्याय! सलगर बुद्रुक येथे ‘सुवर्णश्री अर्बन’चा उद्या भव्य उद्घाटन समारंभ; ठेवींवर १२% पर्यंत व्याज; अवघ्या १० मिनिटांत प्रति तोळा १.३० लाखांचे सोने तारण कर्ज

महिला सक्षमीकरण व आधुनिक बँकिंगचा नवा अध्याय! सलगर बुद्रुक येथे ‘सुवर्णश्री अर्बन’चा उद्या भव्य उद्घाटन समारंभ; ठेवींवर १२% पर्यंत व्याज; अवघ्या १० मिनिटांत प्रति तोळा १.३० लाखांचे सोने तारण कर्ज

November 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..