मंगळवेढा टाईम्स न्युज ।
शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत राज्य सरकारने ई-पीक पाहणीची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मोबाइल नेटवर्क नसलेल्या भागांतील शेतकऱ्यांना आता ऑफलाइन पद्धतीनेही नोंदणी करता येणार आहे.

राज्यातील ३ कोटी ४५ लाख शेतकऱ्यांपैकी ३ कोटी २० लाख शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली असून, उर्वरित २५ लाख शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने शेतरस्ते, पीक विमा आणि फळबागांच्या संरक्षणासाठी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. पीक विमा कंपन्यांविरोधातील शेतकऱ्यांच्या तक्रारी आगामी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मांडण्यात येणार आहेत.

यापूर्वीच्या बैठकीत अनेक तक्रारींचे निराकरण करण्यात आले होते. कंपन्यांना दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरील पंचनामेही देण्यात आले आहेत.
दुष्काळामुळे सुकत असलेल्या संत्रा, मोसंबी, चिकू आणि आंब्याच्या बागा वाचविण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत बोअरवेल करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वीची स्थगिती उठविण्यात आली आहे.

वीज प्रकल्पांसाठी सांडपाण्याचा वापर
कोराडी आणि खापरखेडा औष्णिक वीज प्रकल्पांसाठी पेंच आणि तोतलाडोह धरणांतील पाण्याऐवजी नागपूर महापालिकेच्या प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर केला जाणार आहे.
त्यामुळे पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची बचत होणार आहे. याशिवाय नागपूर जिल्ह्यात पाच हजार रिचार्ज शाफ्ट आणि पाच हजार जलतारा उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
सिमेंट रस्त्यांऐवजी शेतरस्त्यांना प्राधान्य
यंदा जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सिमेंट रस्त्यांची कामे केली जाणार नसून, त्याऐवजी शेतरस्त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेला गती देण्यासाठी सुमारे १२५ विधानसभा मतदारसंघांत सहअध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहेत.
या कामांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीसह आवश्यकतेनुसार आमदार निधीचाही वापर केला जाणार आहे. यातून शेतकऱ्यांना रस्ते आणि मजुरांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












