टीम मंगळवेढा टाईम्स :
मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागातील प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेण्यासाठी तसेच शेतकरी व ग्रामस्थांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी आमदार समाधान आवताडे आज, शुक्रवार दिनांक २ ऑक्टोबर २०२६ रोजी तालुक्याच्या विविध गावांमध्ये पाहणी दौरा करणार आहेत.

या दौऱ्याच्या माध्यमातून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जातील.

दौऱ्याचे सविस्तर वेळापत्रक
महमदाबाद (हु). सकाळी ८:३० वा., लोणार सकाळी ९:१५ वा.,पडोळकरवाडी सकाळी १०:०० वा., रेवेवाडी सकाळी १०:४५ वा., मानेवाडी सकाळी ११:३० वा.व हुल्लूर दुपारी १२:०० वा. असा नियोजित गावांना भेटी देणार आहेत.

उपस्थित राहण्याचे आवाहन:
या दौऱ्यादरम्यान संबंधित गावातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आजी-माजी पदाधिकारी तसेच शेतकरी बांधव व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. “चला.. एकत्र येऊ.. दुष्काळावर मात करूया…” या भूमिकेतून हा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













