टीम मंगळवेढा टाईम्स ।
माणगंगा परिवाराचे संस्थापक-अध्यक्ष तथा सांगोला नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष नितीन (आबासाहेब) इंगोले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सांगोला, मंगळवेढा व परिसरात विविध विधायक सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

वाढदिवसाचा उत्सव समाजसेवेतून… सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास!” हे ब्रीद समोर ठेवून आज मंगळवार, दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी दिवसभर विविध लोककल्याणकारी कार्यक्रम राबवले जाणार आहेत.

विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे नियोजन
वाढदिवसाचा खर्च टाळून समाजातील गरजू घटकांना थेट मदत पोहोचवण्याच्या उद्देशाने दिवसभरात विविध उपक्रम पार पडणार आहेत:

आज सकाळी १०:०० वाजता: इंगोलेवस्ती येथील प्राथमिक शाळेत गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप करून कार्यक्रमाची सुरुवात होईल.
सकाळी १०:३० ते ११:३० वाजता: पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सांगोला येथील जुना पारे रोड परिसरात भव्य वृक्षारोपण मोहीम राबवली जाईल.

सकाळी ११:३० ते सायं. ५:०० वाजता: मूकबधिर शाळा (मंगळवेढा) येथे विशेष मुलांसाठी अन्नदान उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

दुपारी १२:०० ते २:०० वाजता: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्यासाठी सांगोला, मंगळवेढा, शिवणे, वाकी, महूद, हातीद व नाझरे या भागांतील शाळांमध्ये व्यापक स्वरूपात शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येईल.

सायंकाळी ६:०० वाजता: स्थानिक कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘रीलस्टार’ स्पर्धेचा भव्य बक्षीस वितरण समारंभ माणगंगा ॲग्रो मार्ट, कडलास नाका येथे पार पडेल.
सर्वसामान्यांसाठी भव्य मोफत महाआरोग्य तपासणी शिबीर
सर्वसामान्य व ग्रामीण भागातील नागरिकांना एकाच छताखाली दर्जेदार वैद्यकीय सेवा मोफत उपलब्ध व्हावी म्हणून भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत.
स्थळ: माणगंगा ॲग्रो मार्ट, वाढेगांव नाका रोड, कडलास नाका, सांगोला, जि. सोलापूर.
शिबिरातील प्रमुख तपासण्या व वैद्यकीय विभाग:
तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी:
मेडिसिन विभाग, हृदयरोग विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग (हाडांचे विकार), त्वचा व गुप्तरोग, मूत्ररोग विभाग, कान-नाक-घसा विभाग तसेच जनरल सर्जरी विभाग.
नेत्ररोग विभाग (नॅब नेत्र रुग्णालय, मिरज): मोफत डोळे तपासणी, गरजू रुग्णांना जागेवरच मोफत चष्मे वाटप तसेच मोतीबिंदू असलेल्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
निदान व पॅथॉलॉजी सुविधा: मोफत रक्त व शुगर तपासणी, मोफत ईसीजी (ECG) तपासणी तसेच रुग्णांना मोफत औषध वाटप.
रक्तदान शिबीर: याप्रसंगी रुग्णांच्या सेवेसाठी भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.
उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन
सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या सर्व उपक्रमांचा आणि विशेषतः मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचा सांगोला, मंगळवेढा व पंचक्रोशीतील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन माणगंगा परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहिती किंवा नावनोंदणीसाठी ८६०५३४६९६९ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










