मंगळवेढा टाइम्स न्युज ।
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे १२ ते १४ सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली ही कमी दाबाची प्रणाली आता ओडिशा आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीजवळ सरकली असून, ती पश्चिमेकडे मार्गस्थ होत असल्यामुळे विदर्भ, मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

बाप्पाच्या आगमनासोबत जोरदार सरी
कोकण, गोवा आणि मुंबई महानगर क्षेत्रात पालघर, ठाणे, कल्याण-डोंबिवली, शहापूर, मुंबई, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यांवर पावसाचा सर्वाधिक प्रभाव असून १२ सप्टेंबरच्या रात्रीपासून आकाश ढगाळ राहील. रविवार पावसाचा असेल.

अरबी समुद्रातील बाष्पाच्या प्रभावामुळे मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल. उत्तर मुंबईत पावसाचा जोर असेल. गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी काही ठिकाणी जोरदार सरी कोसळतील. १५ सप्टेंबर रोजी सरी सुरूच राहतील.

मुंबई महानगर क्षेत्र आणि उत्तर कोकणात एकूण पाऊस सुमारे २०० मि.मी. पडण्याचा अंदाज असून डहाणू ते तलासरी पट्टयात २५० ते ३०० मि.मी. पाऊस पडू शकतो. १४ सप्टेंबर रोजी उत्तर रत्नागिरीत मुसळधार पाऊस पडेल.

१२ सप्टेंबर यलो अलर्ट असलेले जिल्हे
विदर्भात सरासरी ६० ते १०० मि.मी. तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, सोलापूर पुणे, नाशिक व खानदेश भागात १३ ते १४ सप्टेंबर दरम्यान पाऊस पडेल. राज्याच्या उत्तर भागात ७० ते १५० तर दक्षिण भागात ४० ते ६० मि.मी. पाऊस अपेक्षित आहे.
नाशिक आणि पुणे येथील घाट भागात रविवार आणि सोमवारी २०० ते २५० मि.मी. पावसाची नोंद होऊ शकते.- अश्रेय शेट्टी, हवामान अभ्यासक
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज















