टीम मंगळवेढा टाईम्स (विशेष प्रतिनिधी):
भारतीय स्वातंत्र्याच्या ८० व्या ध्वजारोहण दिनाचे औचित्य साधून आज, शनिवार दि. १५ ऑगस्ट रोजी मंगळवेढा शहरात देशभक्तीपर सुरांचा भव्य सोहळा रंगणार आहे.

सुरसंगम ग्रुप आणि भारतीय माजी सैनिक संघटना (मंगळवेढा व भोसे) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मेरे देशप्रेमियों…’ या विशेष कराओके ट्रॅक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

📍 कार्यक्रमाचा वेळ व ठिकाण:
वेळ: आज सायंकाळी ७:०० वाजता
ठिकाण: ढगे डिजिटलसमोर, शंकरलिंग मंदिरामागे, मंगळवेढा.

प्रमुख पाहुणे व निमंत्रित कलाकार:
या सोहळ्यासाठी सोलापूरचे माजी उपमहापौर श्री. महेश गादेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत.
या संगीतमय संध्येत सोलापूरचे प्रसिद्ध गायक डॉ. नितीन तोष्णीवाल व महेश चव्हाण यांच्यासह ‘सुरसंगम ग्रुप’चे स्थानिक दर्जेदार कलाकार आपल्या गायकीने उपस्थितांना मंत्रमुग्ध करणार आहेत.
सादरीकरण करणारे कलाकार:
दिगंबर भगरे, लहू ढगे, विजय खवतोडे, नवनाथ सावळे, संतोष ढावरे, संगीता इंगोले, वैशाली कोळी आणि रिहा सय्यद.

आयोजकांचे आवाहन
स्वांतत्र्यदिनाचा उत्साह आणि देशप्रेमाची भावना द्विगुणीत करणाऱ्या या संगीतमय सोहळ्यास मंगळवेढा व परिसरातील सर्व देशप्रेमी नागरिक, संगीत रसिक आणि आजी-माजी सैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे नम्र आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










