मंगळवेढा टाईम्स न्युज।
मतदारांना ‘एसआयआर’ अभियानांतर्गत फॉर्म भरून देण्यासाठी १७ ऑगस्टपर्यंत वाढीव संधी मिळाली आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडून ‘एसआयआर’ अभियानातील कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
बीएलओ यांना अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचता यावे, मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी मतदाराला वेळ मिळावा यासाठी निवडणूक आयोगाने ‘एसआयआर’ अभियानाचे सुधारित वेळापत्रक जाहीर करत मतदारांना अजून एक संधी उपलब्ध करून दिली आहे.

जे मतदार कामानिमित्त गावाबाहेर होते, ज्या नागरिकांना फॉर्म भरून देता आला नाही, अशा मतदारांना निवडणूक आयोगाने सुधारित वेळापत्रक जाहीर केल्याने आणखी एक संधी मिळाली आहे.

मुंबई, पुणे आणि मोठ्या शहरांमध्ये अजूनही एसआयआर अभियानाचे काम समाधानकारकरित्या झालेले नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने या मोठ्या महानगरांसह सरसकट महाराष्ट्रभरातील सर्व शहर आणि जिल्ह्यांसाठी सुधारित वेळापत्रक जाहीर केल्याची माहिती आहे.

सुधारित कार्यक्रम
१. बीएलओएद्वारे घरोघरी भेटी १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत २. प्रारूप मतदार यादीची प्रसिद्धी २४ ऑगस्ट २०२६
३. दावा व आक्षेप दाखल करण्याचा कालावधी – २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर २०२६

४. हरकती / दावे / आक्षेप निकाली काढणे २४ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर २०२६
५. अंतिम प्रसिद्धी – २७ ऑक्टोबर २०२६

सोलापुरात ९४ टक्के डिजिटलायजेशन
सोलापूर जिल्ह्यात ‘एसआयआर’चे काम मोठ्या वेगाने सुरू आहे. मंगळवारी दुपारी ४ वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार ९४.४३ टक्के डिजिटलायजेशनचे काम पूर्ण झाले आहे.
तर ९९.७५ टक्के मतदारांपर्यंत फॉर्म पोहोचवण्यात आले आहेत. ३९ लाख ४१ हजार ९५ मतदारांपैकी ३९ लाख ३१ हजार ३९३ मतदारांपर्यंत फॉर्म पोहोचलेले आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













