मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम सुरू केला असून, यात मतदार यादीतले डुप्लिकेट, मयत, शिफ्ट, दुबार झालेले मतदार काढून नवीन पात्र लोकांची यादी नावे समाविष्ट केली जाणार आहे.
त्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी हे तीन वेळा मतदारांच्या घरी येऊन नवीन पात्र लोकांची नावे नोंदवून देणार आहे. त्यासाठी एक फॉर्म दिले जाणार आहे. बीएलओ तुमच्या घरी ३ वेळा येईल. त्या ३ वेळात तुम्ही भेटला नाहीत आणि फॉर्म भरला नाही तर मतदार यादीतून नाव बाद होऊ शकते.

सोलापूर जिल्ह्यात ३९ लाख ३८ हजार ६३१ मतदारांसाठी ३ हजार ७२३ बीएलओमार्फत हे अभियान राबविले जाणार आहे. त्याबाबत जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी बीएलओंना प्रत्येक मतदारांच्या घरी भेटी देण्याचे निर्देश दिले आहेत.

२००२ च्या यादीत नाव असेल तर फक्त मॅपिंग फॉर्म भरून द्यावे लागणार आहे. ०१ जुलै १९८७ पूर्वी जन्म असून मतदार यादीत नाव नसेल तर जन्मतारीख आणि जन्मस्थळ पुरावा द्यावा लागणार आहे.
०१ जुलै १९८७ ते ०२ डिसेंबर २००४ दरम्यान जन्म झाला असल्यास स्वतःचा, आई किंवा वडिलांपैकी एकाचा जन्म पुरावा द्यावा लागेल. ०२ डिसेंबर २००४ नंतर जन्म झाला असल्यास स्वतःचा, आई-वडील दोघांचाही जन्म पुरावा द्यावा लागेल.

ही लागणार ११ कागदपत्रे
जन्मदाखला, पासपोर्ट, जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, १० वी १२ वी प्रमाणपत्र, कुटुंब नोंदवही, सरकारी जमीन घराचे कागद, सरकारी ओळखपत्र, पेन्शन आदेश, वनहक्क प्रमाणपत्र, ०१ जुलै १९८७ पूर्वीचा बँक/पोस्टाचे पासबुक.

घरी नसाल तर काय
बीएलओ 3 वेळा येईल. भेटला नाहीत तर दारावर नोटीस चिकटवेल. त्यानंतरही संपर्क नाही झाला, तर फॉर्म भरण्याची संधी जाईल, २००२ यादीत नाव असेल तर चिंता नसून संबंधितांना फॉर्म भरुन सही करावी लागणार आहे.
३० जून ते २९ जुलै – बीएलओ घरोघरी जाऊन माहिती गोळा करणार
५ ऑगस्ट प्रारुप मतदार यादी- प्रसिद्ध होणार
५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दावा- हरकत दाखल करायची मुदत.
७ ऑक्टोबर अंतिम मतदार यादी- प्रसिद्ध करणार
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज















