मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच सोलापूर जिल्ह्यात त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. काही दिवसांपूर्वीपर्यंत ज्या दुग्ध व्यावसायिकांना परवान्यासाठी वारंवार सांगावे लागत होते,
ते व्यावसायिक आता स्वतःहून पुढे येऊन परवान्यासाठी अर्ज करत आहेत. गेल्या अवघ्या १५ दिवसांत अन्न व औषध प्रशासनाकडे तब्बल १,०६५ अर्ज दाखल झाले असून, दररोज सरासरी १५ हून अधिक अर्ज येत आहेत.

दुसरीकडे, प्रशासनाकडे येणाऱ्या तक्रारींमध्येही मोठी वाढ झाली असून नागरिकांमधील सजगता वाढल्याचे हे स्पष्ट संकेत आहेत.
आठवड्यातून कधी-कधी तक्रारींचे खणखणणारे फोन आता दिवसातून अनेक वेळा वाजत आहेत, तर तपासणीला गेल्यावर विक्रीचा परवाना आहे का? अशी विचारणा करावी लागणारे दूग्ध व्यावसायिक आता परवान्यासाठी स्वतःच अर्ज करीत आहेत.

अन्न व औषध प्रशासनाकडे १५ दिवसांत तब्बल १,०६५ अर्ज आले आहेत. अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी पदभार घेतल्यानंतर लोकच अधिक सजग झाले आहेत.

अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर १५ दिवसापासून दररोज ८ ते १० तक्रारींचे फोन कार्यालयात येत आहेत. आता भेसळखोरांवर कारवाई होईल, अशी लोकांची अपेक्षा असल्याने तक्रारींची संख्या वाढत आहे.

जनतेने अस्वच्छ, उघड्यावरील अन्न खावे लागू नये. निर्भेळ दूध लोकांपर्यंत गेले पाहिजे. गुटखा व इतर भेसळीचे अन्न विक्री करू नये. ही खबरदारी घेतली जात असताना भेसळ करताना कोणी आढळल्यास थेट आमच्याकडे संपर्क करावा. तपासणी करून कारवाई करण्यात येईल.-साहेबराव देसाई, सहायक आयुक्त (अन्न)

१९ विक्रेत्यांना १० हजार रुपये दंड
शाई मिक्स होईल असा पेपर तळलेल्या पदार्थांना वापरण्यास बंदी घातल्यानंतर हातगाडे, चायनीज सेंटर, वडापाव विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली. अन्य बाबींचीही तपासणी झाली. यामध्ये १९ विक्रेत्यांना १० हजार ७०० रुपये दंड आकारण्यात आला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













