मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
मंगळवेढ्यातील ब्रह्मपुरीमध्ये 25 वर्षीय रीलस्टारच्या संशयास्पद मृत्यूने अख्खा महाराष्ट्र हादरला आहे. रीलस्टार रोहिणी पाराध्ये मृत्यू प्रकरणामुळे सोशल मीडियावर प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स असलेल्या रीलस्टार रोहिणी पारध्येने गळफास घेत आयुष्य संपवलं.

दरम्यान, याप्रकरणी पोलीस रोहिणीच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेत आहेत. वैयक्तिक आयुष्यात निर्माण झालेला तणाव व काही टोकाच्या वादामुळे तिनं हे टोकाचे पाऊल उचललं असू शकतं, असे अंदाज वर्तवले जात असताना रोहिणीच्या नवऱ्याची सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेत आहे.

माझी बायको, माझ्या चिमणे, मला सोडून जायचं नव्हतं गं .. ‘ असं म्हणत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

दरम्यान रोहिणीच्या खासगी आयुष्याबद्दल महत्वाची माहिती समोर आलेली. निलेश पाराध्येला भेटण्याआधी रोहिणीचं लग्न झालं होतं. पहिला लग्नातून विभक्त झाल्यानंतर रोहिणी निलेशला भेटली.

दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले, नंतर त्यांनी लग्न केलं. पाच वर्ष दोघांनी सुखाने संसार केला, पण नंतर रोहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकरणाची चर्चा झाली. रोहिणी पाराध्येच्या आत्महत्येनंतर तिचा पती निलेश पाराध्येने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

रोहिणी पाराध्येच्या नवऱ्याची पहिली पोस्ट
माझी बायको माझ्या चिमणे मला सोडून जायचं नव्हतं ग…या पाच वर्षांच्या सोबतीत तिने मला फक्त साथच दिली नाही, तर माझं संपूर्ण आयुष्य उभं केलं. माझ्या प्रत्येक अडचणीत ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली.
माझ्यासाठी तिने किती हाल सोसले, किती कष्ट केले, याची गणतीच नाही.जेव्हा मी खचून जायचो, तेव्हा ती मला आधार द्यायची. जेव्हा सगळे दूर व्हायचे, तेव्हा ती माझा हात घट्ट धरून उभी राहायची. माझ्या आयुष्यातील प्रत्येक वादळातून तिने मला बाहेर काढलं.

आज चांगले दिवस यायला लागले होते… आपल्या स्वप्नांना आकार यायला लागला होता… पण त्याच वेळी तू मला एकटं करून निघून गेलीस.आजही तुझी आठवण आली की मन हंबरडा फोडून रडतं. तुझं हसणं, तुझं बोलणं, तुझी काळजी, तुझं प्रेम… सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं.चिमणे… परत ये गं…

तुला खूप काही सांगायचं बाकी आहे… तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं झालंय.तू शरीराने दूर गेलीस, पण माझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक आठवणीत आणि हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात कायम जिवंत राहशील. मिस यू ग माझ्या चिमणे…
मंगळवेढा तालुक्यात आपल्या पतीसोबत हॉटेल ग्रामपंचायत चालवणारी रीलस्टार रोहिणी पाराध्ये सोशल मीडियावर रिल्स करायची. अनेकदा हॉटेलच्या स्वयंपाक घरातून केलेल्या रील्समुळे अनेकांना खळखळून हसू यायचं. पण त्याच स्वयंपाक घरात पत्राच्या लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत तिने जीव संपवला.
नेहमी हसत खेळत राहणाऱ्या रोहिणीने टोकाचे पाऊल का उचललं ? ती कसल्या नैराश्यात होती? पती-पत्नीमध्ये मतभेद होते का?कौटुंबिक अडचणी होत्या का ?अशा अनेक कारणांची चर्चा होत आहे. तिच्या मृत्यूचा ठोस कारण समोर आलेलं नाही.
मात्र अलीकडे हॉटेल ग्रामपंचायतीच्या सुरू झालेल्या आणखी दोन शाखा आणि कामाचा वाढता ताण यामुळे दोघांमधील वाद वाढल्याचे बोलले जात होतं. काहींच्या मते व्यवसायातील तणावामुळे ती नैराश्यात गेली असावी. दरम्यान पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.(स्रोत:abp माझा)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













