टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहर आणि नगरपरिषदेच्या हद्दीतील विविध प्रमुख ठिकाणांवरील वाढती अतिक्रमणे हटवण्यात यावीत, या मागणीसाठी मंगळवेढ्यातील सजग नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात नागरिकांनी मंगळवेढा नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर केले आहे.
प्रमुख ८ ठिकाणांचा उल्लेख
नागरिकांनी दिलेल्या निवेदनात शहरातील खालील महत्त्वाच्या ठिकाणांवरील अतिक्रमणे तातडीने काढण्याची मागणी केली आहे:

मंगळवेढा-पंढरपूर रोड, एसटी स्टँड परिसर, इंग्लिश स्कूल समोरील परिसर, संत दामाजी पुतळा परिसर, पोस्ट ऑफिस परिसर, कल्याण साहेब दर्गा परिसर, बोराळे नाका परिसर, सांगोला नाका परिसर

प्रशासनाकडून टाळाटाळ नको!
शासकीय दप्तरी नोंद असलेली सर्व अतिक्रमणे कोणतीही दुजाभाव किंवा टाळाटाळ न करता हटवावीत, अशी आग्रही मागणी या अर्जाद्वारे करण्यात आली आहे.

अतिक्रमण निर्मूलनामुळे सरकारचा आणि प्रशासनाचा अनावश्यक खर्च वाचण्यास मदत होईल, असेही नागरिकांनी निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर रेखा गोविंद पवार, चंद्रकांत जगताप,संकेत गोपाळकर आणि इतर स्थानिक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सदर निवेदन नगरपरिषद कार्यालयात ११ मे २०२६ रोजी स्वीकारण्यात आले आहे. आता यावर नगरपरिषद प्रशासन काय पावले उचलते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











