mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

गावात पाणी नाही, मजुरांना पैसे नाही! ग्रामपंचायतींचा आर्थिक कारभार ठप्प; कोर्टाच्या आदेशामुळे सरपंच अडचणीत; ग्रामीण भागात संतापाचा उद्रेक

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 10, 2026
in राज्य
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मंगळवेढा टाईम्स न्युज ।

राज्यातील १४ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींमध्ये सरपंचांना प्रशासक म्हणून नेमण्यात आल्यानंतर या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयाच्या विविध खंडपीठात दाखल झालेल्या याचिकांमुळे ग्रामपंचायतींचा आर्थिक कारभार अक्षरशः ठप्प झाला आहे.

न्यायालयाने दैनंदिन वीज, पाणी, स्वच्छता व आरोग्य सेवा वगळता मोठे आर्थिक व्यवहार करण्यास निर्बंध घातल्याने विकासकामे रखडली असून, सरपंचांवर मोठा मानसिक ताण निर्माण झाला आहे.

सरपंच संघटनांच्या मते, न्यायालयीन सुनावणीदरम्यान झालेल्या निरीक्षणांवरून ‘सरपंच प्रशासक’ ही शासनाची अधिसूचना दीर्घकाळ टिकेल, अशी शक्यता कमी दिसत आहे.

संघटनांनी सुरुवातीपासूनच कायद्यात बदल करून राज्यपालांच्या अध्यादेशाद्वारे सरपंचांना प्रशासक नेमण्याची मागणी केली होती. मात्र, ग्रामविकास विभागाने घाईघाईने केवळ अधिसूचना काढल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याशिवाय सरपंचांच्या नियुक्तीतही दुजाभाव झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. जानेवारी-फेब्रुवारी २०२६ मध्ये मुदत संपलेल्या सरपंचांना प्रशासक करण्यात आले, मात्र त्यापूर्वी मुदत संपलेल्या अनेक सरपंचांना

निर्णय न झाल्यास प्रशासक पदाचे राजीनामे देण्याचा इशारा डावलण्यात आले. वर्धा जिल्ह्यातील ३२५ माजी सरपंचांनी उच्च न्यायालयातून आदेश मिळवूनही प्रशासन त्याची अंमलबजावणी करत नसल्याची तक्रार आहे.

दरम्यान, ग्रामपंचायतींनी पूर्ण केलेल्या विकास कामांची बिले देता येत नसल्याने ठेकेदार आणि बांधकाम साहित्य पुरवठादार सरपंचांकडे तगादा लावत आहेत. ‘देणं ग्रामपंचायतीचं आणि लोडणं सरपंचाच्या गळ्यात’ अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे संघटनांनी म्हटले आहे.

रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरी, गोठे आदी वैयक्तिक लाभार्थी योजनांचे निधी ग्रामपंचायतींकडे जमा असूनही न्यायालयीन निर्बंधांमुळे लाभार्थ्यांना पैसे देता येत नाहीत. त्यामुळे लाभार्थी थेट सरपंचांच्या घरी जाऊन मागणी करत असल्याचेही सांगण्यात आले.

या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाने तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी तीन पर्याय सुचवण्यात आले आहेत.

पहिला पर्याय म्हणजे सरपंच प्रशासक कायम ठेवून आर्थिक व्यवहारांचे अधिकार गटविकास अधिकाऱ्यांकडे देणे. दुसरा पर्याय म्हणजे प्रशासक म्हणून शासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करून न्यायालयात सरकारने स्वतःहून भूमिका स्पष्ट करणे.

तर तिसरा पर्याय म्हणजे राज्यपालांच्या अध्यादेशाद्वारे कायद्यात बदल करून सरपंच प्रशासक पदाला वैधता देणे.

उन्हाळ्यातील पाणीटंचाई, रोजगार हमी व दुष्काळी कामांना प्राधान्य देण्यासाठी ग्रामपंचायतींचा आर्थिक कारभार तातडीने सुरू करणे आवश्यक असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.

दरम्यान, पुढील चार ते पाच दिवसांत यासंदर्भात ठोस निर्णय न झाल्यास राज्यातील अनेक सरपंच प्रशासक पदाचे सामूहिक राजीनामे देण्याच्या मनःस्थितीत असल्याचा इशारा अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील कुर्दूकर यांनी दिला आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सरपंच प्रशासक

संबंधित बातम्या

मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

जमीन खरेदी-विक्री करणाऱ्यांना सर्वात मोठा दिलासा; NA परमिशनची कटकट संपली; तुकडे बंदी कायद्यातही मोठा बदल

June 24, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

गुटखा मिळत नसल्याने संतापला; सोशल मीडियावर तुकाराम मुंढेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला बेड्या

June 24, 2026
धनश्री अर्थकारणाच्या यशस्वी परंपरेचा तीन दिवस दिमाखदार सोहळा; शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थीत संपन्न होणार प्रा.शिवाजीराव काळुंगे सर यांचा अमृतमहोत्सव

दुष्काळाचा बिमोड करण्यासाठी शेतकऱ्यांची वज्रमुठ; मंगळवेढ्यात गाजणार ३४ वी ‘पाणी संघर्ष परिषद; २६ जूनला दुष्काळग्रस्तांचा हुंकार

June 23, 2026
बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा! राजकारण की समाजकारण? मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना थेट आव्हान; नेमका प्लॅन काय?

June 22, 2026
३ वर्षांचं वय अन् काळजाचा थरकाप उडवणारा विक्रम! पोलीस पुत्राने १४ पायऱ्यांची उभी भिंत चढून जाज्वल्य डोरलेचा ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये इतिहास रचला

३ वर्षांचं वय अन् काळजाचा थरकाप उडवणारा विक्रम! पोलीस पुत्राने १४ पायऱ्यांची उभी भिंत चढून जाज्वल्य डोरलेचा ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये इतिहास रचला

June 21, 2026
मंगळवेढेकरांनो! दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालय व इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन; ‘ही’ प्रसिद्ध सिनेअभिनेत्रीची असणार उपस्थिती

दहावीच्या निकालात मोठा उलटफेर! पुनर्मूल्यांकनानंतर मंगळवेढ्याची पाटील महाराष्ट्रात सर्वप्रथम; मंगळवेढा इंग्लिश स्कूलच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

June 20, 2026
बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

मोठी बातमी! सरकारी जमिनी हडपणाऱ्यांना मोठा दणका… ‘या’ जमिनींवर आता थेट महाराष्ट्र शासनाचे नाव लागणार…;  ‘इतक्या’ महिन्यांचा अल्टीमेटम

June 20, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! राज्याला पावसाची हुलकावणी, हवमान विभागाचा हादरवणारा अंदाज; आता थेट ‘या’ तारखेनंतरच पाऊस

June 21, 2026
‘चांगले दिवस येणार होते, पण तू सोडून गेलीस…’ रीलस्टार रोहिणी पारध्ये आत्महत्येप्रकरण; पतीची पहिली पोस्ट चर्चेत, नेमके कारण काय?

स्क्रीनवर लाखो फॉलोअर्स, पण खऱ्या आयुष्यात नरकयातना! रिल स्टार रोहिणी पाराध्येच्या मृत्यूचा खरा विलन अखेर समोर; मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 20, 2026
Next Post
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

संतापजनक! शेतीच्या कारणावरून मुलाचा वडिलांवर चाकूने हल्ला; वडिलांची मुलाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार

ताज्या बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

भीमा नदीकाठच्या वीज समस्येवर मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई! आमदार समाधान आवताडेंच्या पत्राची तात्काळ दखल; पंढरपूर-मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा

June 24, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

जमीन खरेदी-विक्री करणाऱ्यांना सर्वात मोठा दिलासा; NA परमिशनची कटकट संपली; तुकडे बंदी कायद्यातही मोठा बदल

June 24, 2026
Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

क्रॅकडाऊन! मंगळवेढ्यात रस्त्यावर आडवी वाहने लावताय? सावधान! थेट पोलिसांत होणार रवानगी; ‘या’ कारवाईने खळबळ

June 24, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

गुटखा मिळत नसल्याने संतापला; सोशल मीडियावर तुकाराम मुंढेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला बेड्या

June 24, 2026
धनश्री अर्थकारणाच्या यशस्वी परंपरेचा तीन दिवस दिमाखदार सोहळा; शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थीत संपन्न होणार प्रा.शिवाजीराव काळुंगे सर यांचा अमृतमहोत्सव

दुष्काळाचा बिमोड करण्यासाठी शेतकऱ्यांची वज्रमुठ; मंगळवेढ्यात गाजणार ३४ वी ‘पाणी संघर्ष परिषद; २६ जूनला दुष्काळग्रस्तांचा हुंकार

June 23, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला; प्रारूप आरक्षण जाहीर होताच इच्छुकांची उडाली धावपळ; हरकती नोंदवण्यासाठी अवघे ‘इतके’ दिवस शिल्लक

June 23, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा