टीम मंगळवेढा टाईम्स।
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका घेत खळबळजनक आरोप केले आहेत.

मराठा समाजात फूट पाडण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर आता माझ्यावर थेट हल्ला करण्याचा किंवा मला अटक करण्याचा शेवटचा डाव आखला जात आहे,” असा सनसनाटी दावा जरांगे-पाटील यांनी सोलापूर येथे केला.

शुक्रवारी रात्री यासंदर्भात अत्यंत खात्रीलायक माहिती मिळाल्याचे सांगत जरांगे-पाटील यांनी सरकारला खुले आव्हान दिले, “मला अटक करायची असेल तर करूनच दाखवा! त्यानंतर मराठे काय आहेत, हे तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात समजेल.

’सुरक्षा बाजूला काढली, पण मराठा समाज शांत बसणार नाही‘
पत्रकारांशी बोलताना जरांगे-पाटील म्हणाले की, मराठ्यांची एकजुट तोडण्यासाठी सरकारने आजवर सर्व प्रकारचे डावपेच वापरून पाहिले. मात्र, मराठा समाज एकत्र राहिल्याने हे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. “आता तर माझ्या प्रवासादरम्यान पोलिसांचा मिळणारा बंदोबस्तही बाजूला काढण्यात आला आहे.

‘आमचे बहुमताचे सरकार आहे, आमचे कोणी काही करू शकत नाही’ असा एक मोठा भ्रम या सरकारच्या मनात निर्माण झाला आहे. पण मराठा समाज आपली ताकद काय आहे हे लवकरच दाखवून देईल. हे आमच्या हक्काचे पक्के आरक्षण आहे आणि ते मिळवल्याशिवाय आम्ही आता गप्प बसणार नाही,” असा सज्जड इशारा त्यांनी दिला.

’फडणवीस-शिंदेंवर भाष्य बंद, पण कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचा डाव थांबवा’
आपली भूमिका स्पष्ट करताना जरांगे-पाटील म्हणाले, “गेल्या वर्षभरापासून मी मुंबईत जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाष्य करणे पूर्णपणे बंद केले आहे.

सरकारने कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचा गुप्त डाव आता त्वरित बंद करावा. तुम्ही जर मराठा समाजाच्या पाठीत खंजीर उपसणार नसाल, तर आम्ही पूर्वीसारखेच प्रेमाने आणि सन्मानाने वागू.”
जरांगे-पाटलांच्या या थेट आव्हानामुळे आणि आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चांगलेच तापले असून सरकार आता यावर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













