टीम मंगळवेढा टाईम्स पंढरपूर ।
मंगळवेढा-पंढरपूरचे प्रसिद्ध उद्योजक संजय आवताडे यांचा वाढदिवस अत्यंत विधायक आणि सामाजिक भावनेतून साजरा करण्यात येत आहे.


या निमित्ताने आज शनिवार दि.९ मे रोजी पंढरपूर येथील ‘पालवी प्रतिष्ठान’ मधील अनाथ बालकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी ‘सहभोजन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


सामाजिक बांधिलकीचा आगळावेगळा उपक्रम
उद्योजक संजय आवताडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंगळवेढा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत.


मात्र, पालवी प्रतिष्ठानमधील निराधार लेकरांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा सहभोजन कार्यक्रम विशेष कौतुकाचा विषय ठरला आहे.


अनावश्यक खर्चाला फाटा देऊन समाजातील वंचित घटकांसाठी मदतीचा हात पुढे करणे, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे संयोजकांनी सांगितले.


मान्यवरांची उपस्थिती
या स्तुत्य उपक्रमासाठी संयोजक दिगंबर यादव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यामध्ये नगरसेवक सोमनाथ अवताडे, नगरसेवक बाबा कोंडूभैरी, सोमनाथ भुई, अप्पासाहेब पट्टणशेट्टी या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पालवी येथील बालकांसोबत हा आनंदोत्सव साजरा केला जाईल.

संजय अवताडे यांच्या या आगळ्यावेगळ्या वाढदिवस सेलिब्रेशनचे आणि त्यांच्या सामाजिक दृष्टिकोनाचे मंगळवेढा-पंढरपूर परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे.


केवळ हार-तुरे आणि होर्डिंग्ज लावून वाढदिवस साजरा करण्यापेक्षा, अनाथ मुलांच्या आयुष्यात एक वेळेचा सुखाचा घास देऊन सामाजिक ऋण फेडण्याचा हा प्रयत्न आहे.— दिगंबर यादव (संयोजक)


अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











