मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
बोरामणी जवळ असलेल्या मस्के वस्तीवर शुक्रवारी रात्री रक्ताचा सडा पडला. अवघ्या दीड एकर जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली.
यामध्ये आई, मुलगी आणि १७ वर्षीय मुलाचा समावेश असून, या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील मस्के कुटुंब आपल्या शेतातील घरात वास्तव्यास होते. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने गायत्री सुधाकर मस्के (३६), त्यांची मुलगी प्रियंका सुधाकर मस्के (२०) आणि मुलगा शिवराज सुधाकर मस्के (१७) हे तिघेही रात्री घराच्या गच्चीवर झोपण्यासाठी गेले होते. वस्तीवर इतर कुणीही नसल्याचा फायदा घेत अज्ञात हल्लेखोरांनी गच्चीवर चढून त्यांच्यावर तलवारीने सपासप वार केले.

या भीषण हल्ल्यात गायत्री आणि प्रियंका यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी १७ वर्षांच्या शिवराजने आपल्या आई आणि बहिणीला वाचवण्यासाठी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.
हल्लेखोरांनी त्याच्या हातावर वार केल्यानंतर, तो जीव वाचवण्यासाठी गच्चीवरून खाली खोलीच्या दिशेने पळाला. मात्र, निर्दयी हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग केला. तो खाली पोहोचताच त्याला गाठून त्याच्यावर तलवारीने वर्मी घाव घालून त्यालाही संपवण्यात आलं.
७५ लाखांची जमीन ठरली काळ
मिळालेल्या माहितीनुसार, मस्के कुटुंबाची हायवेलगत दीड एकर जमीन आहे. बाजारभावानुसार या जमिनीची किंमत सुमारे ७५ लाख रुपये इतकी आहे.

याच जमिनीवरून गेल्या काही दिवसांपासून कुटुंबात तीव्र वाद सुरू होते. हा वाद इतक्या टोकाला गेला की त्याचे पर्यवसान या तिहेरी हत्याकांडात झाले असावे, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
संशयित दीर फरार; पोलिसांची सहा पथके रवाना
याप्रकरणी मृत महिलेचा दीर पप्पू मस्के याच्यावर संशयाची सुई असून तो सध्या फरार आहे. या भीषण हत्याकांडानंतर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी सहा विशेष पथके वेगवेगळ्या दिशेला रवाना केली आहेत.

शनिवारी रात्री उशिरापर्यंत सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. एका छोट्या जमिनीच्या तुकड्यासाठी स्वतःच्याच रक्ताच्या नात्याची अशी निर्घृण हत्या झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा अधिक तपास केला जात आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














