टीम मंगळवेढा टाईम्स ।
पतीने मुलीची मागणी केली असता तिने नकार दिला, या किरकोळ कारणावरून संतप्त झालेल्या पतीने, सासूने आणि नणंदेने मिळून एका २१ वर्षीय विवाहितेवर दगड आणि काठीने गंभीर हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवेढ्यातील कचरेवाडी येथे घडली आहे.
याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रतीक्षा अभिजीत यादव (वय २१) ही सध्या कचरेवाडी येथील आपल्या माहेरी राहत होती.

दि.५ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४:०० च्या सुमारास तिचा पती अभिजीत रतन यादव आणि सासू राणी रतन यादव (दोघे रा. मारापूर) हे माहेरी आले.

यावेळी पतीने “तुला झालेली लहान मुलगी माझ्याकडे दे, मी तिला काय पण करीन, नाहीतर मारून टाकीन” अशी धमकी दिली.

जेव्हा प्रतीक्षाने मुलगी देण्यास नकार दिला, तेव्हा चिडलेल्या पती, सासू आणि नणंद पूजा संदीप काळुंगे यांनी तिला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

यावेळी मध्यस्थी करायला आलेल्या प्रतीक्षाच्या आई-वडिलांना आणि भावाला देखील आरोपींनी शिवीगाळ करत मारहाण केली.

दगडाने नाकावर वार, काठीने भावाला मारहाण
हा वाद इतका विकोपाला गेला की, सासू राणी यादव हिने जमिनीवर पडलेला दगड उचलून प्रतीक्षाच्या नाकावर जोरात मारला, ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली.

तसेच नणंदेने तिला जमिनीवर ढकलून दिल्याने तिच्या गुडघ्याला जखम झाली. आरोपी पती अभिजीत याने प्रतीक्षाचा भाऊ संदीप याला काठीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
वैद्यकीय उपचार आणि पोलीस कारवाई
घटनेनंतर जखमी प्रतीक्षाला तातडीने ग्रामीण रुग्णालय, मंगळवेढा येथे दाखल करण्यात आले. मात्र, दुखापत गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी सोलापूर हॉस्पिटलमध्ये आणि त्यानंतर पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागले.
याप्रकरणी प्रतीक्षा यादव हिने दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवेढा पोलिसांनी पती अभिजीत यादव, सासू राणी यादव आणि नणंद पूजा काळुंगे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११५(२), ३५२, ३५१(२)(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कोळी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












