टीम मंगळवेढा टाइम्स।
पाटखळचे सरपंच ऋतुराज बिले-पाटील यांचे वडील कै. हर्षराज सुखदेव बिले यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त आज शुक्रवार, दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी पाटखळ येथे विविध भक्तिमय आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
स्व.हर्षराज बिले-पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात अध्यात्म आणि सेवेचा संगम पाहायला मिळणार आहे.

आज दुपारी १२:१५ वाजता: कै. हर्षराज बिले यांच्या प्रतिमेवर ‘पुष्पवृष्टी’ आणि अभिवादन कार्यक्रम बिले निवासस्थान, स्वगृही, पाटखळ येथे होणार आहे.

”कै. हर्षराज सुखदेव बिले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास परिसरातील नागरिक, नातेवाईक, ग्रामस्थ आणि

मित्रपरिवाराने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,” असे आवाहन सरपंच ऋतुराज बिले-पाटील व बिले परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












