मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
सोलापूर जिल्ह्यातील सर्व माध्यामिक शाळांच्या वार्षिक परीक्षा १० एप्रिल ते २२ एप्रिल २०२६ या कालावधीत होणार आहेत. या परीक्षेचा निकाल ३० एप्रिलपर्यत तयार करून १ मे २०२६ रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
याशिवाय २ मे २०२६ पासून शाळेला उन्हाळी सुट्टी सुरू होणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यामिक) सचिन जगताप यांनी ‘लोकमत’ला दिली.

सोलापूर जिल्ह्यातील माध्यामिक शाळांच्या परीक्षेसंदर्भात नुकताच पुणे विभागाच्या शिक्षण उपसंचालकांनी आढावा घेत शिक्षण विभागाला सूचना दिल्या आहेत.

या बैठकीत माध्यमिक शिक्षण विभागाच्या विविध प्रश्न, अडचणी व पटनोंदणीसंदर्भात चर्चा करून आढावा घेतला. या बैठकीला पुणे विभागातील माध्यामिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी उपस्थित होते.

सध्या मार्च महिना सुरू आहे, वाढत्या उन्हामुळे शाळेच्या वेळेत बदल करण्याची मागणी पालकवर्गातून होत असल्याचेही सांगण्यात आले.

२० मार्चपासून तालुकास्तरावर प्रश्नपत्रिकांचे वाटप
इयत्ता नववीची द्वितीय सत्राची परीक्षा २३ मार्चपासून सुरू होणार असून ४ एप्रिल २०२६ रोजी शेवटचा पेपर असणार आहे. अकरावी विज्ञान, वाणिज्य व कला विभागाची परीक्षा २५ मार्च २०२६ पासून सुरू होणार असून

४ एप्रिलला परीक्षा संपणार आहे, अशी माहिती मुख्याध्यापक संघाचे तानाजी माने, श्रीशैल पाटील व विष्णू मस्के यांनी दिली. २० मार्चपासून प्रश्नपत्रिकांचे वाटप सर्व तालुकास्तरावरून करण्यात येणार आहे.
माध्यमिक विभागातील शाळांचा अभ्यासक्रम सध्या अंतिम टप्प्यात आला आहे. शाळा स्तरावरून परीक्षेची तयारी सुरू करण्यात आली आहे. गुणवत्ता वाढीसाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न करण्यात येत असल्याचेही जगताप यांनी सांगितले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










