मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगावच्या जि. प. प्राथमिक शाळेत चौथीच्या वर्गात शिकणारा यश हरी हब्बू (वय १०) हा चिमुकला
गंगेवाडी येथील दगड खाणीमध्ये साठलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेला आणि त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली.

सकाळची शाळा सुटल्यानंतर यश दुपारी एक वाजता गंगेवाडी येथील गट नंबर २२२/१ या बंद पडलेल्या खणीमध्ये कासेगाव येथील वर्गातील सवंगड्यांबरोबर पोहण्यासाठी गेला.

लहान वयाचा यश पोहण्यासाठी पाण्यात बसला. त्याला पोहायला येत नसल्याने घसरून खणीत पडल्याने खोल पाण्यात बुडाला.

सदर खाण जवळपास ७० ते ८० फूट खोल आहे. मित्रांनी आरडाओरड केली. बघता बघता यश दिसेनासा झाला.
घटनेची माहिती मिळताच सोलापूरहून आलेले अग्निशामक दल आपत्तीकालीन व्यवस्थापन कर्मचारी घटनास्थळी धावले. अथक प्रयत्न करूनसुद्धा त्याचा मृतदेह सायंकाळी आठ वाजेपर्यंत मिळू शकला नाही.

या कामी तालुका पोलिस स्टेशनचे पीएसआय घोडके, हेड कॉन्स्टेबल रशीद बाणेवाले, सर्कल माळी, आरिफ हुडीवाले यांच्यासह प्रशासनाधिकारी मृताच्या शोधण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

अंधार असल्या. बॉडी शोधणे कठीण जात आहे. प्रसंगी कासेगाव येथील ग्रामस्थ सरपंच शोध मोहिमेसाठी प्रयत्न करत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज















